Saturday, October 8, 2022

मरगळ ( मराठी कविता )

मरगळ
Marathi language _ मराठी भाषा

अंगणी निवांत पहुडलेली दुपार
काळ जरा थांबलेला
वारा मही पांगलेला
मिहिर ही टांगलेला
कणाकणात चैतन्याचा कोण बडविल पणव ?

अंगणी भ्रांत अवघडलेली रांगोळी
रंग चुरगळलेला
सडा मरगळलेला
का बहर हा गळलेला
ठिपक्यात नक्षत्रांची ही कोण फुलविल पुनव ?

अंगणी श्रांत कोमेजलेली लक्ष्मी वृंदा
सुगंध हरवलेला
कंदील मंदावलेला
बंध हा भारावलेला
पर्णापर्णात माधवाची कोण रुजविल कणव ?

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

No comments:

Post a Comment