स्मृती चिन्ह
Marathi language _ मराठी भाषा
दग्ध व्याकूळ नयन
आहे बेलगाम मन
जाळे गुरफटलेले
प्रश्नचिन्हांचे जीवन ।
काळी गडद रजनी
धुरकट सूर्यबिंब
आशा विषण्ण हृदयात
छिन्नभिन्न प्रतिबिंब ।
भूतकाळी बघताना
येतसे भरुनी डोळे
ओठांवर अंकित ग
तुझ्या प्रीतीचे सोहळे ।
रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment