पारंबी होजो लेका
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली
डागेल बीज नायी
निसवजो गा चोखा
चोचीले देजो दाना
बेकीले देजो धोका ।
वलीताच्या डांडाचं
पानी होजो लेका
कुपाची होजो काटी
आधार देजो लोका ।
खोट्याले सोडचिठ्ठी
खऱ्याचा घेजो ठेका
चोट्ट्यायले दनके
सावाचा होजो नाका ।
पाखरावानी राज्या
गंगनी घेजो झोका
पाय ठिव मातीचे
रुजाले देजो मोका ।
झाड मोठं वाढलं
पारंबी होजो लेका
सांजच्याले मातर
वडाले देजो टेका ।
रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
( आगामी ' वरधामायच्या कोऱ्यात ' कवितासंग्रहातून )
No comments:
Post a Comment