Saturday, March 27, 2021

माय त माय रव्हस ( भोयरी कविता )

⚜माय तं माय रव्हस ⚜

माय तं माय रव्हस , 
          केती आरती गावनो 
देस जलम वा माय ,
           केती किरती गावनो ।
पर पाखंड ला देखो , 
            बिह्या मं बदले नाव
माय बनन साठी वा , 
        सोडस आपलो गाव ।धृ।

माय तं माय रव्हस ,
        जीव को कुप रव्हस
आतो, भाऊज, मावसी ,
        सास,काकी,मामी, जीजी
सेजारीन पाजारीन,
         माय को रूप रव्हस
गार आमारं मुंडा की ,
        वोमं बी माय को नाव।१।

जास लेकन दायजो, 
            गाडी मोटर सामान
सोनो नानो देज पैसा ,
            येमं सं माय को मान?
वोको चित मन देखो,
        काहे लगावो जी भाव।२।

रात दिन मरमर,
        वोला किंमत नहाय
वोकं काम की गिनती ,
        पैसा मं कही नहाय
वोकी सास..आस देखो,
        वोला बी लागस झाव।३।

तोरी धन दवलत ,
        वोको मोठो अभिमान
माय जमिन की माती,
         भारी तुरसी को पान
दुइ बोल सहद का,
         तुमी बोलो येकडाव।४।

नको करू पूंजापाती ,
         वा तं दिवा की बाती
येक कोरा दुइ डोरा,
         रस्तो दिखाडस जोती
जिती बारस दुस्मान,
         करे हिरदामं घाव।५।

©✒ सुरेश महादेवराव
            देशमुख , नागपूर

दुय घडी जिंदगानी. bhoyar culture _ भोयर संस्कृति. bhoyari dialect _ भोयरी बोली

दुय घडी जिंदगानी ( भोयरी कविता )
Bhoyar culture _ भोयर संस्कृति
Bhoyari dialect _ भोयरी बोली

सीधी साधी जिंदगानी
काह्ये करे लंदफंद
कोनी क पेट प पाय
बेइमानी कर बंद ।१।

मोह काम रागतम
लोभ हिरस न मद
भरे भदाड पाप का
करे मन सदसद ।२।

दिसे साजरो खुद ला
ध्यान दादा बयचंद
करो केतो दान पुन
होस गा मुसरकंद ।३।

समझावो जी मन ला
सोडो जह्यर को फंद
सत करम क साठी 
चाल थांबाडो बेबंद ।४।

दुय घडी जिंदगानी
दुय घडी को आनंद
येक सास को अंतर
मंग दुकान च बंद ।५।

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर


Friday, March 26, 2021

सरवा - भाग : २३. varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

सरवा - भाग : २२
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

सकारी परभ्याचा ताप कमी झाला . त्यानं ताप आला मून घरी कायी फोन केला नायी . उलिसी कनकन व्हतीच मना ! जेवाचं मून जेवला पन तोंडाचं कडूपन व्हतच . आज थो कलासले नायी गेला . 
बोरडाच्या परिकस्येचा निकाल लागला . कलासच्या पोराइत परभ्याचा तीसरा नंबर व्हता . कालेज अन् कलासवाल्यायनं परभ्याले फटु मांगतले . मंदार अन् परभ्या फटु काहाडासाठी गेले . परभ्या सनवारची वाट पाहून रायला व्हता . त्याले येकडाव घरी जाचं व्हतं . त्याले मोठ्या मुस्किलीनं सनवारी इतवारची येका दिवसाची सुट्टी भेटली .  परभ्याचे दाआजी फटफटी घिवून त्याले घ्याले आले . 
फटफटी आवाराच्या दरुज्याजवर थांबली  , तसाच परभ्या ब्याग घिवून उतरला न अंदर पराला . माय सपरीतून येतच व्हती ....
' बापू ऽऽ......' असं मनत मायनं परभ्याले कवटारलं . 
पटापट त्याचे मुके घेतले अन् रडाले लागली . दोघं बी रडून रायले व्हते . 
' तू नायी त् सारं घर सुनं सुनं लागते रे बापू....' मायनं परभ्याचे डोरे सेवानं पुसत मनलं .
दाआजीनं फटफटी आंगनात लावली न सपरीत आले . 
' सांजच्या पारी कायले रडता ?' दाआजीनं दोघायकडं पाहात मनलं . 
' रडत नायी जी ... खूसीचे आसू व्हय .... किती दिवसानं लेकराले पाह्यलं बापा ...' मायनं डोरे पुसत मनलं .
' थांबा , च्या ठिवतो ... तुयी हातपाय धुवून घे बापू .' मायनं उठत मनलं .
च्या पिवून दाआजीनं फटफटी काहाडली , वावरातल्या मांडवात जा साठी .
' डग् ऽ डगऽ डगऽ ... ' फटफटीचा आवाज आवारात घुमला .
परभ्या बंगईवर बसून मोबाईल इचकत व्हता . माय त्याच्या जवर बसली . परभ्यानं मोबाईल बंद केला . 
' का करून देऊ माह्या बापूले ? ' मायनं परभ्याचा लाड करत इचारलं .
' मिसऱ्याची भाकर , सार आन् सेंगदान्याची चटनी कर .' परभ्यानं मनलं .
' बस ! भाकरीची येवढी नवारी झाली ? मी कालच दह्याचा चक्का बांधला हाये सिरीखंडासाठी .... मनलं पुऱ्या , वडे करीन .' मायनं नवलानं परभ्याकडं पाहात मनलं . 
' बरं , थे उद्या करसीन .' परभ्यानं मनलं .
' बापू ऽऽ  हाये का घरी ?' सद्यानं गल्लीतूनच आवाज देल्ला .
' या रे ऽ..... ' परभ्यानं मोठ्या आवाजात मनलं .
सद्या न वस्या सपरीत आले . 
' चाला रे पोरं हो रान्नीत . तुमच्या गोस्टीमाता व्हते न माह्या सयपाक यी व्हते . चाला , सेंगा न पापडं भाजून देतो तवरीक ...' मायनं बंगईवरून उठत मनलं . 
रान्नीत वस्या आन् सद्याचे सवाल कायी खतम व्हत नोते , न् परभ्याच्या नवलाच्या गोस्टी बी सपत नोत्या . सद्या अन् वस्यानं बारावीतच मुक्काम केलता . सयपाक करता करता माय परभ्याकडं नवलानं आन् मायेनं पाहात व्हती .... पोरायच्या गोस्टी आयकत व्हती.. येकदम मायचा हिरदा अन् डोरे भरून आले... आपरंगच !
गडीमानसं आले.... दाआजी आले पर ह्यायच्या गोस्टीचा पूर सपता सपेना .
सारे संगच जेवले... खानं कमी आन् गोस्टीचा बजारच जास्त !
' उद्या येजान रे पोर हो.... उद्याचं जेवन इकडेच हाये .... समजलं ? ' मायनं ताटं उचलता उचलता मनलं .
दुसऱ्या दिवसी सकारीच वस्या आन् सद्या परभ्याच्या घरी आले . आज मायनं दोनी सालदारीन बायाले घरीच कामासाठी बलावलं . घरात निरा तेला तरनाचा घमघमाट सुटला व्हता . सकारीपासूनच जेवाखावाचा धुमाकडा व्हता . आज मायची रान्नी कायी सुटली नायी . परभ्यासाठी सेव , चिवडा , चकल्या बनवनं चालू व्हतं आन् सयपाक यी चालू व्हता . दुपारी दाआजी आले . त्यायच्या मांगच गडीमानसं बी आले . मोठ्या सपरीत पंगत बसली . आज परभ्याच्या घरी सनाचाच माहोल व्हता . पुरा दिवस खान्यापेन्यात अन् गोस्टीमातात गेला . 
दुसऱ्या दिवसी झुंझुरकाच परभ्याच्या दाआजीनं त्याले होस्टेलवर पोहोचवून देल्लं . 
' चांगला अभ्यास करसीन बेटा....' परभ्याले छातीसी धरून दाआजीनं मनलं . 
चवकीदार डोरे चोरत दोघायकडं पाहात व्हता . 
' फोन करत राह्य रोज... आं... ' परभ्याच्या दाआजीनं निरोप घेत मनलं . 
परभ्याचे कलास चालू झाले . तारखीवर JEE , AME CET चे पेपर झाले . कलास बंद झाले आन् परभ्या गावाले आला . आता निकालाचीच वाट व्हती . उनाच्यानं परभ्या आता कायी घराबाहिर निंगे नायी . वस्या रोजच घरी ये . सद्याच्या मांगं बकऱ्या चाराचं काम व्हतं . थो येर भेटला तवा ये . 
परभ्याच्या मायचं सेवऱ्या , कुरोड्या , पापडं , वड्याचं काम खतम व्हत आलतं . उलिसे पापडच बाकी व्हते . माय सालदारीन बायायले संगं घिवून काम करे . येटाराल्या बाया बी राह्येच मना . आता ह्या कामातून परभ्याले सुट्टी भेटली व्हती . 
आंब्याचे रसावर रस होवून रायले व्हते . धाब्यावरचा आंब्याचा माच खतम होत आलता . माय येका बालटीत पानी भरून त्याच्यात परभ्यासाठी आंबे काहाडे . 
येक दिवस मायनं रातरीच्या जेवनासाठी वरन भाताचा कुकर लावला आन् सपरीत बायासंगं पापडं लाटाले लागली . परभ्या आन् वस्या काम्पुटरवर कायी इचकत व्हते . 
' धडाड ऽ धूम ऽऽ... ' असा मोठ्ठा आवाज रान्नीतून आला . थ्या आवाजानं सारेच दचकले . माय धावतच रान्नीत गेली . मांगं मांगं सारेच गेले . आड्याले , भितीवर आन् रान्नीभर वरनभाताचा दानोडाच दानोडा ! कुकर संगच ग्यास स्येगडी बी चपक चापक झालती . 
' माय ! सिट्टीचा त आवाजच नायी आला . सारा नासोडा झाला बाई... ' मायनं कुकर आन् स्येगडी उचलत मनलं .
सालदारीन बाई फडा घिवून झाडाले लागली . येटारातले यी दोन चार बाया - मानसं जमा झाले . तितक्यात दाआजीच्या फटफटीचा आवाज आला . सारे पट्पट् सपरीत आले . माय पापडाचा पसारा आवराले लागली . येक बाॅम्ब त फुटला , आता दुसरा यी फुटन का ? , याची साऱ्यायले धाकधूक वाटत व्हती . सगरे चिडीचूप ! सालदारीन बाईनं पट्कन चूल पेटवून हातपाय धुवाले पानी आन् चाहाचं आंधन ठिवलं . परभ्या दाआजीजवरचा झोरा घिवून रान्नीत गेला . 
' झालं का बावा पापडाचं काम ? ' दाआजीनं बंगईवर बसत मनलं .
सारे चूप . परभ्या दाआजीजवर येऊन बसला . मायनं पानी देल्लं .
' बापू , पानी घिऊन जा हातपाय धुवाले .'  सालदारीन बाईनं रान्नीतूनच आवाज देल्ला . 
दाआजीनं हातपाय धुतले . माय चाहा घिऊन आली . 
' दूध दिऊ का रे बापू ?' मायनं परभ्याले इचारलं .
' नायी , मलाई अन् साकर असन त् दे .' परभ्यानं मनलं .
मायनं परभ्या आन् वस्यासाठी दोन बसीत मलाई साकर आनली . दोघायनं थे घोटू घोटू खाल्ली . दाआजी वावराकडं निंगाले आन् घराचा सारा तान सयील झाला . 
' बरं झालं बापा , मालकाले मालूम नायी पडलं थे ... ' सालदारीन बाईनं चाहाचा घोट घेत मनलं . 
' सांगा त् लागनच बाई ... स्येगडीचा बरनाल टुटला हाये थो अन् कुकर बी सुधरवा लागन न !' मायनं तिच्याजवर आपला कप देत मनलं . 
वस्या न परभ्या काम्पुटरमंदी गुंग झाले . झाक पडल्या सद्या झोरा घिऊन आला . 
' का आनलं रे बावा ?' वस्यानं इचारलं .
' बापू साठी टेम्भरं आनले हाये .' सद्यानं परभ्याले झोरा देत मनलं .
परभ्यानं झोऱ्यातले पिकले पिकले टेम्भरं काहाडले आन् सद्या - वस्याले द्याले लागला . 
' तू च खा नं बापू , आमचं त हरदमचच हाये .' सद्यानं मनलं .
' घ्या रे , लय हाये ...' परभ्यानं जबरदस्तीनं देत मनलं . 
गावातल्या तीन कोनट्यातले तीन सोबती . ... अलग अलग घरातले... अलग अलग थरातले , पन पाखरावानी टेम्भराचा सवाद घ्याले लागले . बिनकामाचा वस्या , घराचं वझं डोकस्यावर घिऊन सद्या अन् पुढच्या सिकस्यनासाठी मगजमारी करनारा परभ्या .... हे रानपाखरावानी... ! मातीतला गोडवा त्यायच्या नसानसातून वाह्यत व्हता . ना मिरगाच्या पान्याची वाट ना नवारी ! जवा तवा त्यायच्या दोस्तीचा सुगंध पसरत राह्ये गावभर... सिवारभर...
हे कोनाले पटे बी आन् कोनाले खटके बी !     ( क्रमशः ) 

लेखक : इंजि . सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर 

Monday, March 22, 2021

कसी पेटन गा चुल ( वऱ्हाडी कविता )

कसी पेटन गा चुल
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

आला पानी अवकाली
पडे पेर्ते व्हा ले भुल
घर सिवार सादरे
कसी पेटन गा चुल ।१।

उभ्या गव्हाचा नासोडा
पाह्यतो गा मुलमुल
झाला सवान गा सोला
कसी पेटन गा चुल ।२।

लाखमोलाचा संतरा
झाला दादा मातीमोल
आसू इरले डोऱ्यात
कसी पेटन गा चुल ।३।

नायी भेदराले भाव
इकली गा मुंदी डुल
भांडे गले लक्षुमीचे
कसी पेटन गा चुल ।४।

डोरे बयलाचे गरे
कसी पांघरन झूल
नायी दमडी खिस्यात
कसी पेटन गा चुल ।५।

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

कसी पेटेन गा चुल. bhoyar culture _ भोयर संस्कृति. bhoyari dialect _ भोयरी बोली

कसी पेटेन गा चुल
Bhoyar culture _ भोयर संस्कृति
Bhoyari dialect _ भोयरी बोली

आयो पानी अवकाली
पडी पेर्ते व्हा ला भुल
घर सिवार सादरे
कसी पेटेन गा चुल ।१।

उभऽ गहू को नासोडो
देखु बापा मुलमुल
भये सवान गा सोलो
कसी पेटेन गा चुल ।२।

लाख मोल को संतरो
भये दादा मातीमोल
आसू इऱ्या डोरा म च 
कसी पेटेन गा चुल ।३।

नही भेदरा ला भाव
बिकी मुंदी आन डुल
भांडा गया लक्षुमी का
कसी पेटेन गा चुल ।४।

डोरा बयील का गरे
कसा पांघरेन झूल
न्हाय खिसा म दमडी
कसी पेटेन गा चुल ।५।

रचना :  सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

मन ( भोयरी कविता ). bhoyar culture _ भोयर संस्कृति. bhoyari dialect _ भोयरी बोली

मन ( भोयरी कविता ) 
Bhoyar culture _ भोयर संस्कृति
Bhoyari dialect _ भोयरी बोली

मन चिलाटी का काटा
वरबाडे सारो आंग
खाज खाजखुयरी की
पुरो तडपाये आंग ।१।

मन तंदरी को गाव
चाली माकोडा की रांग
भेट्या येक दिन पंख
मंग भूई प धडांग ।२।

मन चकवो चांदन्यो 
निरी फाकीस गा भांग 
खलऽ वरतऽ झकोला
नव गिऱ्या को पंचांग ।३।

मन आस भास छाया 
वकी अगास म टांग
कब कहान जायेन 
नही लागे पत्तो थांग ।४।

मन माया को घंगार 
वको वरतऽ मचांग
झर झर पाझरे जी 
बह्ये गंगा दुय आंग ।५।

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

Saturday, March 20, 2021

अजब गजब - ५३ : धार संस्थान. bhoyar culture _ भोयर संस्कृति. bhoyari dialect _ भोयरी बोली

अजब गजब - ५३ : धार संस्थान
Bhoyar culture _ भोयर संस्कृति
Bhoyari dialect _ भोयरी बोली

बेरन पहाडी क मंझार स्थापित धार नगर की उतपत्ती राजा मुंज वाक्पति संग जुडीस . तलवार क पत्ता को गाव येनऽ मतलब को ' धारलांग ' नाव को गाव पह्यले यहान होतो . ९ वी सदी पासिन १४ वी सदी पावतर धार म परमार राज रह्ये . कयी बरस धार राजधानी रही . बाद म हिफाजत क हिसाबकन् राजधानी मांडवगड ला बनायी . राजा भोज क बेरा म धार सिकस्यन को मोठो ठानो होतो . भोजस्याला वको केंद्र होतो . दुनिया भर म यहान की पढ़ाई मसहूर होती . 
१४ वी सदी म यहान मुगलराज आये . 
इ.स. १७२८ म बाजीराव पेसवा न मालवा प सवारी करी . तब वून क संग रामोजी सिंदे , मल्हारराव होलकर आन् उदाजी पवार होता . जित्या बास्त धार अन् वोकऽ अगल बगल का ३८ गाव की जागीर उदाजीराव ला भेटी .  धार संस्थान मराठा राज क कब्जा म आये . इ.स. १७३२ म सामंत आनंदराव पवार क रियासत की धार राजधानी बनी . अंगरेज राज म धार संस्थान को ४६०८ वर्ग कि.मी. को इलाखो होतो . वकी सालाना कमाई १६.५ लाख रुप्या होती . धार संस्थान ला पंधरा तोफ क सलामी को मान होतो . 
आनंदराव को पोरग्यो यसवंतराव इ.स. १७६१ म पानिपत क लढाई म काम आये . 
राघोबा दादा न धार ला आसरो लेयेतो . वहान च दुसरऽ बाजीराव को जलम भये . 
इ.स. १८०७ म दुसरऽ आनंदराव को सर्गवास भयो . वोकऽ बाद धार संस्थान म मांडव , धार , धरमपुरी येतरा च परगना बाच्या . आघऽ दासीपुत्र मुरारराव न बगावत करी . वोन बेरा बडोदा क बापू अन् रघुनाथ सिंद्या क सहारा कन् रानी मयनाबाई न धार संस्थान बाचाडे . 
इ.स. १८१९ पासिन धार संस्थान अंगरेज क मालवा पलटन साठी सालिना ६०००/ रुप्या देत होता . इ.स. १८५७ म धार संस्थान जबत भयेतो जी इ.स. १८६४ ला वापिस भेट्ये , पर वोन बेरा बेरसिया परगनो हरदम साठी भोपाल ला देना म आये . 
इ.स. १९४८ म धार संस्थान  ' मध्य भारत संस्थान संघ ' म सामिल भये . चवथा आनंदराव महाराज येन संघ का कनिस्ट उपराज्य परमुख बन्या . 
१ नवंबर १९५६ म धार संस्थान मध्य प्रदेस राज्य को हिस्सो बन्यो . 

लेखक : इंजि . सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

Friday, March 19, 2021

बोली अन् भास्या : येक गलतफह्यमी. bhoyar culture _ भोयर संस्कृति. bhoyari dialect _ भोयरी बोली

बोली अन् भास्या
Bhoyar culture_ भोयर संस्कृति
Bhoyari dialect _ भोयरी बोली

अ ) बोली : संकल्पना अन् स्वरूप
बोली या रोज क वेव्हार को स्वाभाविक साधन स . तोंडी परंपरा कन् आवस तेकन वोकऽ आंग म येक परकार को जितोपन रव्हस . वा साधी च पर परिनामकारक रव्हस . वकी स्वाभाविकता इच वकी खासियत ! 
सरकारी कामकाज , लेखी वेव्हार , सिकन साठी बोली को बापर होत नी .  पर आब प्रायमरी सिकस्यन साठी बोली ला बापरनो चालू भयेस . 
ब )  बोली कसी बनस 
बोली , भास्या येक सामाजिक संस्था स . आन् जागा न बेरा ( कार ) क कारन कन् वा बदलत जास . वोम बदलन की ताकद रव्हस . समाज मंझार लोगना बेगरा बेगरा गट करकन् रव्हस . इ गट सामाजिक , राजकीय , आर्थिक , कामधंदा , बेपार , पढाई , जात असो कोनतो बी रव सकस . असा गटना की आपलऽ गट पुरती खास भास्या बनस . वा सबन समाज बापरस वोनऽ भास्या सिन कयी बाबद म फरक धरकन् रव्हस . इ गट च बोली बनन को कारन रव्हस . थोडका म समाजजीवन म आपरंग च बेगरा बेगरा गट बनत रव्हस आन् वोनऽ गट क जगन क तरीका ला भायेन असी भास्या रूप धरस आन् वोमिन बोली को जलम होत रव्हस . 
क) बोली की खासियत 
परमान भास्या बोलनी वाला लोग सबन किथिन सुधऱ्या रव्हस , बोली बोलनारा लोग सबन बात म पासऽ रव्हस , सरकारी - सिकस्यन पानी , धरम क गोस्ट साठी परमान भास्या च बापरस तेकन बोली हलकी रव्हस असी लोगना की समजूत भयीस . बोली या वकऽ गरज पुरती पुरी विकसित भास्या स . हर बोली का आपला उच्चारन अन् व्याकरन का कयी नियम रव्हस . बोली को पुरो अभ्यास करन क बाद बोली असुध्द रव्हस नी त बोली का उच्चारन गलत रव्हस , असो कवनो येकदम गलत स . बोली या सव टका भासिक रूप स . बोली या लिखन की भास्या बनूच सकत नी या गलत धारना स . दुनिया म खूब मोठो लिखान बोली म होतानी दिसस . तेकन बोली म लिखान पेलन की ताकद स , या बात सिध्द होस . 
बोली ला व्याकरन अन् भासिक संरचना नी रवत या गलतफह्यमी स . 
बोली या भास्या को परिपूर्न रूप स . 

लेखक : इंजि . सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

Wednesday, March 17, 2021

धुड्डी ( भोयरी कविता ) . bhoyar culture _ भोयर संस्कृति. bhoyari dialect _ भोयरी बोली

धुड्डी
Bhoyar culture _ भोयर संस्कृति
Bhoyari dialect _ भोयरी बोली

आयो सिमगो रंगीलो
देखो आखरी तिवार
तन मन झनकाऱ्यो
रुत बसंत बहार ।१।

साल भर क दुख ला
होरी मंझार म बार
संग धुपट इपट
उपे अगास क पार ।२।

देवो होरी ला निवद
गाठी चाकोली की मार
गावो गानो फगवा को
सोडो गारी गुफतार ।३।

देये फुल परसा को
रंग भायी जोरदार
खेले धुड्डी पोटुबाटु
भिज्या सारा नर नार ।४।

नाना मोठा संगी साथी
भय गया येकसार
रंग अबीर गुलाल
गंगा जमुना क पार ।५।

रंग धुड्डी को जी गुनी
भरे असार म सार
सुख दुख क साल ला
करे हासीखुसी सार ।६।

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

Sunday, March 14, 2021

अजब गजब - ५२ : कुमारी मेघा परमार. bhoyar culture _ भोयर संस्कृति. bhoyari dialect _ भोयरी बोली

अजब गजब - ५२ : कुमारी मेघा परमार 
Bhoyar culture _ भोयर संस्कृति
Bhoyari dialect _ भोयरी बोली

कोनती बी बात केतरी मोठी होयेन , यको बोलचाल अन् साहित्य म नाप स हिमालय ! देस क महादेव मुखी हद क राखन साठी हिमालय की मोठ्ठीजात दिवाल स . भगवान भोलेनाथ अन् सरग को स्थान हिमालय ! 
हिमालय की पुरी दुनिया म सबसिन उच्ची चोटी ' माउंट येवरेस्ट '. वोला च नेपाली म ' सागरमाथा ' कोस . हरेक को सपनो रव्हस क , वोपर चेंगकन सरग को आन् आपलऽ हिम्मत को दरस्यन करनु . उंगल प गिनती करन लाईक लोगना को इ सपनो पुरो होस . येनऽ सपना ला पह्यल ऽ डाव पुरो करेस मध्यप्रदेस आन् आपलऽ समाज की पोटी , ' कुमारी मेघा परमार ' न ! 
मध्यप्रदेस क सीहोर जिला म उलझावन गाव क जवर येक गाव स ' भोज नगर ' . कुलपुरुस चक्रवर्ती राजा भोज क नाव क येनऽ गाव म जलम लेयो भोजवंसी कुमारी मेघा परमार न , जिन न मध्यप्रदेस , देस आन् समाज को नाव मोठो करे . भोजपाल परिन इ गाव ५० कि.मी. दूर स . 
भोजनगर क दामोदर जी परमार अन् मंजू देवी येनऽ कास्तकार माय - बाप की येकली पोटी को नाव मेघा . नानपन पासिन च मेघा न येवरेस्ट पर चढ़न को सपनो देख्योतो . माय - बाप न बी वोकऽ सपना ला पुरो करन साठी साथ देयी . गाव म मेघा क बराबर वाली पोटीना को बिह्या भय रह्येतो . लोगना बी वोकऽ मायबाप पर बिह्या साठी जोर डाय रह्याता . माय - बाप न मेघा सिन येनऽ बारा म बात करी त् मेघा न कह्ये क , ' मला थोडो बखत देव  , मु असो काम करून क तुमाला अभिमान वाटेन .' येनऽ घटना क बास्त मेघा न येवरेस्ट प चढ़न की बानी धरी आन् वोमऽ वा सफल बी भयी . येवरेस्ट प चढ़न क दुय बरस पह्यले मेघा को पीएचडी साठी नंबर लाग्येतो . पर येवरेस्ट क चढाई की तयारी साठी वोला पढ़ाई थांबाडनी पडी . मेघा रवींद्रनाथ टागोर विस्वविद्यालय म एम एस सी योगा सीख रह्यीती . 
फिजिकल फिटनेस साठी मेघा ला रोज घाडी मेहनत अन् मानसिक फिटनेस साठी योग , प्राणायाम करत होती . वोकऽ तन मन म येवरेस्ट चढ़न की च धुन , जिद होती . येवरेस्ट क माथा पर चढ़न की वकी जिद ला माय - बाप , ट्रेनर रत्नेस पांडे अन् आए ए एस अफसर एस. आर . मोहंती सर को मोठो सहारो भेट्ये . मेघा रोज सीहोर पासिन भोजपाल पावतर साइकल चलावत होती . 
पह्यलऽ डाव मेघा को सपनो सिरफ ७०० फुट क दूरी कन् टुट्यो . पर मेघा न हिम्मत नी हारी . खूब मेहनत करी . आन् २२ मार्च २०१९ ला झुंझुरका च पाच बाजता येवरेस्ट क माथा पर पाय धरे . 
* येवरेस्ट प चढ़ाई क बेरा हरदम पानी नी भेटत . हर बखत बदन अंदरसिन टुटस . सास लेन ला घाडी तकलिफ होस . चढ़ाई क बेरा हात पाय लटलट कापस . रस्ता म चढ़ाई करनी वालाना की लास बी दिसस . माथा प पुग्या बास्त  अॉक्सिजन की खूब कमी होय जास . 
* मेघा कोस क ,' जिंदगी साठी प्यार सिन जास्त जरुरी आॅक्सिजन स , तेकन आमी न झाड पेड लगाया च पायजेन .' 
* माउंट येवरेस्ट क माथा पर मेघा न तिरंगो फह्यराये आन् वहान सीहोर की माती अन् पत्थर धऱ्या . 
* माउंट येवरेस्ट क माथा पर चेंगनी वाली २४ बरस की मेघा मध्यप्रदेस आन् समाज की पह्यली च बेटी स . 
* मेघा न येवरेस्ट संग च दुनिया क चार खंड की सबसिन उच्ची चोटी पर चढ़न को बी रिकार्ड बनायेस . 
* महिला बाल विकास अभियान , ' बेटी बचाओ , बेटी पढ़ाओ ' की मेघा " ब्रांड एम्बेसडर " स . 
लेखक : इंजि . सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

फुल परसा को फुले ( भोयरी कविता )

फुल परसा को फुले 
Bhoyar culture _ भोयर संस्कृति
Bhoyari dialect _ भोयरी बोली

रुत बसंत की आई
प्यार सिवार म घुले
लागी जंगल म आग
फुल परसा को फुले ।१।

ढ़ंग न्यारो परसा को
रंग स्येंदरी गा खुले
सूर्व्य उतरे भूई प
फुल परसा को फुले ।२।

जोस परस ला मोठो
घोस मोठाजात झुले
होस खोवस सिमगो 
फुल परसा को फुले ।३।

तीन पत्ता तीन लोक
देव मानुस बी भुले 
असी रंगी रासलीला
फुल परसा को फुले ।४।

राजो सिवार को सोभे
मस्तराम हाले डुले
आंगोपांग तेज उले
फुल परसा को फुले ।५।

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

Saturday, March 13, 2021

अजब गजब - ५१ : पंचमुखी महादेव , धराड. bhoyar culture _ भोयर संस्कृति. bhoyari dialect _ भोयरी बोली

अजब गजब - ५१ : पंचमुखी महादेव , धराड
Bhoyar culture _ भोयर संस्कृति
Bhoyari dialect _ भोयरी बोली

आमारऽ देस आन् परदेस म कई देवना की पूंजा होस , पर भगवान भोल्यानाथ की महिमा सबसिन येतरी मोठी स क वून की पूंजा हर जागा प होस . बेद म भगवान सिव जी ला ईस्वर आन् रुद्र क नाव कन् वून को मोठोपन दिखाडेस . 
यजुरबेद क अकरावऽ अध्याय क ५४ व मंतर म कह्येस क , रुद्र देव न भूलोक की रचना करीस आन् वोला सूर्व्यदेव न उजारे . रुद्र देव की परचंड जोत या बाकी देवताना क बनन की स्यक्ती स . भगवान सिव पह्यलो भगवान स जिन न धरती की रचना कर कन् आपलऽ तेज कन् बाकी देवताना ला तेजस्वी बनायो . 
मध्यप्रदेस क महू नीमच हायवे पर धराड गाव स . रतलाम परिन धराड ११ कि.मी. दूर स . धराड गाव म अतिदुरलभ पंचमुखी महादेव मंदिर स , वोला च महाकाल मंदिर बी कोस . येनऽ देऊर ला तीन तल्ला स . खलतऽ पंचमुखी महादेव , वोकऽ वरतऽ क तल्ला प महाकाल आन् वोकऽ वरतऽ साधना की जागा स . पुरानऽ जमाना म यहान रिसी मुनी , साधु संत साधना करत होता . 
इ देऊर १२ व सदी म परमार राज म बांध्येस . पह्यले येनऽ देऊर ला ' फूटला देऊर ' क नाव कन् वरखत होता . 
इ.स. १९५० म यहान रमत गमत संत सुंदर गिरी जी महाराज पुग्या . तब देऊर की खसता हालत देख कन् वून ला घाडो दुख भये . वून न पन ले क जवरिक देऊर को जिरनोधार नी होयेन तवरिक वूई उपास धरेन . वोकऽ बास्त गाववाला न देऊर ला सुधारे , जेला दुय बरस लाग्या . देऊर सुधार का बास्त गिरी जी महाराज का गुरू आया आन् वून न मूंग दार क पानी कन् गिरी जी महाराज को दुय बरस को उपास तोड्ये . 
रतलाम की बसावट यी धराड सिन भयी . सब सिन पह्यले महाराज रतनसिंग जी धराड आयाता . 
उज्जैन क बाद म धराड ला च महादेव महाकाल स . 
खासियत : * कोनतऽ बी देऊर म दुय सिवलिंग नी रव्हत . पर येनऽ देऊर म मंझार क तल्ला प महाकाल भगवान बिराज्यास . अन् ठीक वोकऽ खलतऽ गाभारा म पंचमुखी महादेव सिवलिंग स . पुरऽ नरबदा अंचल म असो सिवलिंग नहाय , तेकन येनऽ देऊर ला अति दुरलभ मानस . 
* सिव ला पंचमुखी आन् धा ( दस ) हात वाला मानस . सिवजी क पसचिम मुख की पूंजा धरती तत्व क रूप म करस . उत्तर मुख की पूंजा पानी तत्व क रूप म, दकसिन मुख की पूंजा तेजस तत्व क रूप म आन् पूरब मुख की पूंजा वायु तत्व क रूप म करस . भगवान सिव क वरतऽ ( उर्ध्व ) क मुख की पूंजा अगास तत्व क रूप म करस . येनऽ पाच तत्व की उपज भगवान सदासिव सिन भयीस . येनऽ पाच तत्व कन च सारऽ चराचर जगत की उपज भयीस . 
* पंचमुखी महादेव को पूरब मुख ' सृष्टी ' , दकसिन मुख ' स्थिती ', पसचिम मुख ' प्रलय ', उत्तर मुख ' कृपा ' आन् वरतऽ ( उर्ध्व ) को मुख ग्यान का सूचक स . 
* भगवान सिव को वरतऽ को मुख ईस्यान दूध क रंग को , पूरब मुख तत्पुरुस पिवरऽ रंग को , दकसिन मुख अघोर निरो रंग को , पसचिम मुख सद्योजात पांढरऽ रंग को आन् उत्तर मुख वामदेव कारो रंग को स . 
* भगवान सिव ला ' त्रिनेत्र ' कह्येस . इ तीन डोरा मनजे सूर्व्य , चंदर अऊर वहनी होय . 
* येनऽ देऊर ला केतरा खंबा स , यकी आजवरी कोनीच गिनती नी कर सक्यास . हर बार बेगरी बेगरी गिनती आवस .
मान्यता : * यहान महारुद्र होम हवन होस . पूरनाहुती क दिन यहान नि: संतान बाईलोगना खीर को परसाद लेस . यकन वून ला संतान को सुख भेटस , असी मान्यता स . 
* सिवरातरी आन् सरावन मह्यना म पंचमुखी महादेव की पूंजा गंगाजल , पंचामृत आन् पंचपल्लव कन करनु . पाच पत्ता ( पंचपल्लव ) म पीपर , उंबर , बड , पिलखन का पत्ताना पानी म डायकन् वोनऽ पानी कन् पूंजा करनु . यकन सिवजी तुरुत परसन्न होस , तमाम दोस को नास होस आन् आसिरवाद भेटस , असी मान्यता स . 
रचना : इ देऊर नागर ( भूमिज ) रचना को स . येनऽ देऊर ला अरधो मंडप ( अर्धमंडप ) , मंडप आन् गाभारो स , जेम को अर्धमंडप खस गयेस . येनऽ देऊर का खंबा , दरुजा आन् मूरतीना देखनी लायक स . 
* इ देऊर इ.स. १९८२ पासिन पुरातत्व विभाग म गयेस .
# यहान की देखभाल पुजारी सत्यनारायन बयरागी आन् महाकाल समिति करस .

( सहयोग : इंजि . जालमसिंग सोढ़ा जी , जोधपूर ) 
लेखक : इंजि . सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

Wednesday, March 10, 2021

अजब गजब - ५० : अमरकोट. bhoyar culture _ भोयर संस्कृति. bhoyari dialect _ भोयरी बोली

अजब गजब - ५० : अमरकोट 
Bhoyar culture _ भोयर संस्कृति
Bhoyari dialect _ भोयरी बोली

पाकिस्तान म कराची पासिन ३२५ कि.मी. पूरब म अमरकोट इ जिला को ठिकानो स . अमरकोट जिला की हद हिंदूस्थान ला लाग कन् स . येक जमाना म अमरकोट सिंध प्रांत की राजधानी होती . यहान अरधी आबादी हिंदू स आन् अरधी आबादी मुसलमान की स . अमरकोट पर हजार बरस पासिन परमार वंस क सोढा खानदान न राज करे . 
अमरकोट नगर क मंझार म अमरकोट को किल्लो ( गढ़ ) स . 
असी मान्यता स क अमरकोट को किल्लो अमरसिंग नाव क राज्यानऽ बांध्ये . 

इतिहास : * जगदेव परमार क आठवी पीढी म महाराज बाहडदेव भयो . वूई विकरम संवत ११८३ ला बाडमेर क गादी पर बस्या . महाराज बाहडदेव को पोरग्यो छत्रपती चाहडराव न बाडमेर पासीन ५० कोस दूर शिवपुरी प राज करे . छत्रपती चाहडराव ला येक पोटी भयी , वको नाव कल्याण कॅंवर ... स्यक्ती सच्चिमाय माता मनजेच कल्याण कॅंवर ! छत्रपती चाहडराव जी ला येक पोटी आन् दुय पोटुना भया . मोठो पोरग्यो सांखला जी जिन न जांगूलदेस पर राज करे . नानऽ पोटु को नाव सोढा जी ...
विकरम संवत १२८२ पासीन सोढा जी न रतेकोट , थारपारकर आन् अमरकोट पर राज करे .
* सोढा जी ला दुय पोटुना भया . मोठो कुॅंवर चाचकदेव अन् नानो कुॅंवर दूदाजी . दूदाजी को पोरग्यो राणा महेंदरसिंग . राणा चाचकदेव को पोरग्यो राणा रायदेव न विकरम संवत १३०३ म अमरकोट , रतेकोट क सिंगासन पर बस्या . 
* राणा रायदेव को पोरग्यो जेभरम सिंग आन् जेभरम सिंग को पोरग्यो राणा जसहड . राणा जसहड को पोरग्यो राणा सोमेश्वर . राणा सोमेश्वर जी ला चार पोटुना होता , राणा दुरजनसाल , राणा आशराव , भीमसिंग आन् तेजपाल . राणा दुरजनसाल न विकरम संवत १४०४ पासीन राजपाट संभाले . राणा दुरजनसाल को पोरग्यो राणा खिंवरा . राणा खिंवरा जी न विकरम संवत १४३९ पासीन राज करे . वून क पडपोतो राणा हमीर सिंह को राजतिलक विकरम संवत १५४२ ला . 
* राणा हमीर सिंह मोठो वीर होतो . वून क राज म हुमायून राणा हमीर सिंह ला स्यरन आयाता . आपलऽ लाडी ला वोऽ अमरकोट म राख्येतो . अमरकोट म च अकबर को जलम भये . बात च हुमायून मऱ्यो . तेकन नान पन म च अकबर राज्यो बने . अकबर राणा हमीर सिंह को उपकार नी भुल्यो . वोनऽ  राणा हमीर सिंह ला येक मुहर दी . वोनऽ मुहर को डाग राणा हमीर सिंह न आपलऽ राज क गाय, बयील आन् बाकी जनावर ला देये . वोनऽ डाग ला नाव पड्यो , ' हमीराणा डाग '! हमीराणा डाग वालऽ कोनतऽ बी जनावर साठी अकबर क राज को ट्याक्स ' जजिया ' नी लागत होतो , वूसोच हमीराणा डाग वालऽ जनावरना की बोली ( निलामी ) बी नी होत  होती . 
* राणा हमीर सिंह क बाद वून को पोरग्यो राणा बीसा गादी पर बस्या . विकरम संवत १६३३ म राणा बीसा न महाराणा  परताप क मदत साठी आपलो मुहतो भामास्याह देयेतो . 
* राणा बीसा को पोरग्यो राणा तेजसिंग . वून ला दुय पोटुना भया . येक राणा कान्हा आन् दुसरो राणा चाम्पा . 
* राणा कान्हा न विकरम संवत १६८१ पासीन रतेकोट को राजपाट संभाले . वून को पोरग्यो राणा गोविंद सिंह . राणा गोविंद सिंह को पोरग्यो नारायण सिंह सोढा . नारायण सिंह सोढा जी न विकरम संवत १७१९ पासीन राज करे . वून क राज म विकरम संवत १७२५ पासीन मोठो अकाल पड्यो . वून न आपलऽ राज क लोगना साठी पुरो राजखजानो खोल डाये . सात बरस रह्ये येनऽ अकाल म तमाम जनता ला वून न पोसे . वून को पोरग्यो कुॅंवर गंगादास सिंह .
* राणा चाम्पा जी ला अमरकोट को राज भेट्येतो . वून का दुय पोटुना , येक राणा गंगा सिंग आन् दुसरो राणा हापा सिंग . राणा गंगा सिंग ला पाच पोटुना भया . राणा परताप सिंह , मान सिंह , सुरताण सिंह , भोपत सिंह आन् सूरजमल . आघऽ सुरताण सिंह जी न राजपाट संभाले . 
* आबऽ वरतमान म अमरकोट ला वून की २६ पीढी स . २६ व पीढी का राणा हमीर सिंह . वून पोरग्यो कुंवर करनी सिंह जी . 
* आबऽ क पीढी का पूरवज राणा अरजून सिंह क बेरा म हिंदुस्थान पाकिस्तान को बटवाडो भयो .  वून न आपली जागीर पाकिस्तान म च राखन की सोची . 
* राणा अरजून सिंह को पोरग्यो राणा चंदर सिंह पाकिस्तान पिपल पार्टी का संस्थापक सदस्य होता . 
# अमरकोट क सोढा घराना मिन कई वंसज विधायक , सांसद , मंत्री बन्यास . 

लेखक : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

Sunday, March 7, 2021

मै और सिग्नल Hindi language _ हिंदी भाषा

मै और सिग्नल
Hindi language _ हिंदी भाषा

पहले हमारे शहर में ट्रैफिक सिग्नल नही हुआ करते थे , लेकिन स्कूली किताबों में सिग्नल की जानकारी होती थी . उस समय ट्रैफिक पुलिस अपने इशारों सें ट्रैफिक को नियंत्रित करते थे . बाद मे मुख्य चौराहों पर सिग्नल लगे . रंग से खेलना आसान है , व्यवहार में रंगो की आज्ञा मानना बडा मुश्किल ! लोगों को सिग्नल की आदत नही थी . सिग्नल लाल होने पर ट्रैफिक पुलिस एक मोटा रस्सा आडा पकडते थे . सिग्नल हरा होने पर रस्सा सडक पर छोड देते थे . उस रस्से के उपर से स्कुटर चलाते समय फिसलने का अजीबसा डर रहता था .. कुछ दिन के बाद रस्से गायब हुये .. लोग शायद अभ्यस्त हुये थे.. पर कुछ महान जल्दबाज लोग हरे सिग्नल का इंतजार किये बगैर ट्रैफिक पुलिस के सामने से अपने वाहन तेजी से निकालते थे... यह दौर बदस्तुर आज भी जारी है !
गंतव्य तक जाते जाते सभी सिग्नल हरे मिलना यह तो गुलबकावली के फुल से भी दुर्लभ हुआ . 
फिर दौर आया सडकें चौडी बनाने का . कुछ ही दिनों में सडके डिवायडर संग चौडी बनी.. सुकून सा आया.. ट्रैफिक ने भी गहरी सांसें ली और नयी चमचमाती सडकों का आनंद लेना प्रारंभ किया . सिग्नल के भीड की आपाधापी कम हुई . ट्रैफिक लेन के हिसाब से चलनी लगी . सभी चौराहों पर सिग्नल लगे . अब सिग्नल में भी एक लुभावना फर्क आया... वे स्मार्ट हुये . रंग के साथ डिजिटल टायमर घडी भी लगी . अब सिग्नल पर कितनी देर रुकना है , यह ज्ञात होने लगा ! इंजिन चालू रखना है या बंद करना है , यह समझने लगा .
हमारा शहर पुतलों का ! सडके चौडी बनाने समय चौराहे के मध्य स्थापित पुतलों को किनारे स्थानांतरित किया . पता नही क्यो मुझे उन्हे देख कर ऐसा लगने लगा की वे सिकुड कर अपराधभाव ओढ़कर खडे है .
लोग चलते रहे.. ट्रैफिक बहती रही ... बढ़ती रही . सुंदर फुटपाथ अब दुकान , रेहडी लगाने की , वाहन पार्क करने की जगह बनी . पैदल चलने वालों को ना पहले जगह थी ना अब जगह थी . सडक किनारे चलना या सडक क्राॅस करना पहले भी सर्कसनुमा काम था और आज भी वही हालात थे . 
सायकल और सायकल रिक्षा नदारद हुये...  चारपहियां वाहनों की संख्या बेतहाशा बढ़ी . अब ट्रैफिक के हिसाब से सडके पहले जैसी तंग नजर आनी लगी . सिग्नल के पिछे मेले जैसी भीड इकठ्ठा हो जाती . 
' कर्रऽ कच्चऽऽ...' इस ब्रेक और टायर घिसने के आवाज की वारंवारिता में इजाफा हुआ . काली सडक पर गहरे काले रंग के निशान बढ़े . दुर्घटनाओं में वृध्दी हुई . सर पर हेल्मेट पहनना अनिवार्य है , यह बात बहुत सारे सर में घुंसी ही नही . 
ट्रैफिक पुलिस अब धूप बरसात में खडे नही रहते . उन के लिये बनाए शेड तो विरह वेदना से ग्रस्त...
सडक के दुभाजक और ट्रैफिक आयलंड को अब नया काम पकडा दिया . हर राजनैतिक पार्टी , छोटे बडे संगठन , बस्ती के महान विभूतीयों की जन्मदिवस , आगमन , शुभकामनाएं की छवी उन के कंधे पर टंगने लगी . हर धर्म - जाती के त्यौहारों के पोस्टर्स , झंडे , तोरन ट्रैफिक सिग्नल से लेकर स्ट्रीट लाईट के खंबों को सुशोभित करने लगे . भला केबल वालें पिछे क्यों रहते ? खंबो खंबों से बुनने लगा केबल का मकडीजाल शहर में ! ट्रैफिक आवाज और प्रदुषण की तयशुदा मर्यादा तो कब की भंग हो चुकी थी . मोबाईल के बडे बडे टॉवर चढ़ बैठे इमारतों पर और डिवायडर पर . केबल का जाल केवल उपर ही नही बल्की सडक किनारे भूमिगत भी फैला सुरसा की तरह पुरे शहर में ! नाराज हुई प्रकृती. अब चिडिया नही चहकती आंगण में ! 
सिग्नल पर ट्रैफिक बढ़ता गया . एक हरे सिग्नल मे आधी ट्रैफिक ही पार हो पाती . सिग्नल पर वाहन रुकने का समय बढ़ता गया . इस बढ़ते समय के कुछ जौहरी थे . प्रॉपर्टी बेचने , घर बैठे पैसे कमाए और कई सारे विज्ञापन बांटने की जगह बन गया सिग्नल ! अब सिग्नल केवल ट्रैफिक नियंत्रित करने का साधनमात्र ही नही था . उसने अपनी दुनिया बसा ली . अपनी संस्कृती बनाई . सिग्नल पर वाहन तो अस्थाई थे पर सिग्नल का कुनबा स्थाई था , जिस में ट्रैफिक पुलिस , तरह तरह के विक्रेता , विज्ञापन दाता , भिकारी होते है .
दंड , लालच , भूक , भावना यह हथियार बडे काम के ! बहती ट्रैफिक में से कुछ एक जेबें हत्थे चढ़ ही जाती है .
ट्रैफिक बहती रहती है ... सिग्नल थमते , चालू होते ... लाल , पिला , हरा रंग चमकते रहता पल पल ... स्याह रंग के पृष्ठभूमि पर ..!
फिर मेट्रो और सिमेंट के सडकों का जाल बुनने की तैयारी ..एक तरफ से लेन बंद .... कही रोडा... कही भारी भरकम मशिनरीज . अब ट्रैफिक रक्तवाहिनीयों में ब्लॉकेजेस की वजह से बहते रक्त की तरह अवरुद्ध होती सी बहती है . सुबह शाम तो ट्रैफिक का सैलाब .... कर्णकर्कश हॉर्न , इंजिनों की निरंतर ध्वनी ... सडक नदारद .. केवल वाहनों के छत ही नजर आते है ... खुद को असंख्य मकडीयों के जाल में फंसा महसूस करता हूं . .. दम घुटते जाता... बेचैनी सी छाती हुई मनमस्तिष्क मे . 
' टकऽ टकऽ टकऽ.... ' इस आवाज के साथ अचानक कार की विंडो पर झुलती हुई छाया .. धुंधली सी... मै हडबडी में उतारता हू शिशा यंत्रवत ! 
' बाबूजी ऽ...' एक धुंधला श्यामल पंजा बढ़ता है मेरी ओर ... मै अचेतन... पिछे से जोर जोर से हॉर्न बजने शुरु होते है ... आगे हरा रंग चिढ़ाते हुए.....

लेखक : इंजि . सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

Friday, March 5, 2021

महादेव पाराबती. bhoyar culture _ भोयर संस्कृति. bhoyari dialect _ भोयरी बोली

महादेव पाराबती
Bhoyar culture _ भोयर संस्कृति
Bhoyari dialect _ भोयरी बोली

ठानो कयलास गड
पूंजू करूस आरती
भोरी जोडी स सुगढ़
महादेव पाराबती ।१।

हर गड कयलास
होये धडधड छाती
दरस्यन ला चेंगूस
महादेव पाराबती ।२।

जीव सिव येकाकार
आदिमाया माय सती
कर बापा उपकार
महादेव पाराबती ।३।

ओमकार नाद बेद
नटराज की किरती
आस तुमारी वरद
महादेव पाराबती ।४।

करे हादड हुदड
गरीब ला साडेसाती
आमी सारा अनगढ़ 
महादेव पाराबती ।५।

तिसा जलम का आमी
भयी दुरदस्या गती
गंगाधर पाजो पानी
महादेव पाराबती ।६।

गाव सीव जी वसाड
ध्यान देवो उमापती
बाजे रिकामा भदाड
महादेव पाराबती ।७।

आदिगुरु आदिनाथ
करू रोज दिवा बाती
आबऽ दिखाडो उजिड
महादेव पाराबती ।८।

गरा धरे हलाहल
निलकंठ पसुपती
तुमी उतारो जह्यर
महादेव पाराबती ।९।

हर हर महादेव
आदि अंत तुमी जोती
महामाया महाकाल
महादेव पाराबती ।१०।

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर


Thursday, March 4, 2021

पान परसाले तीन. varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

पान परसाले तीन
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

घरोघरी मेढे तुह्ये
नंदी तोरनी चालले
गावा सिवारात माया
दाठ्ठे तुह्यानं फुलले ।१।

बोरी बाभरीच्या रानी
काटे पायात सलले
नादी परसरामाच्या
मन रंगानं खुलले ।२।

लोकरंगाचा सोबती
लोकमनाले झेलले
लोकं गनगोत त्याचे
वरबाडून चालले ।३।

साध्या सुध्या परसाचे
चित असे गा उलले
नाही काटाकुटा आंगी
तरी त्यालेच सोलले ।४।

बेलपतरीच्या भावा
फुलं सूर्व्याचे फुलले
रंग सिमग्याचा भूई
देव अगासी भुलले ।५।

पान परसाले तीन
लोक तीन यी तोलले
म्हादेवाच्या तिरसुली
कसे अल्लाद झुलले ।६।

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

Tuesday, March 2, 2021

सरवा - भाग २१ . varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

सरवा - भाग २१
परभ्याची बोरडाची परिकस्या झाली , पन त्याचे कलास चालूच व्हते . परभ्या आन् मंदारनं  JEE संगच AME CET चे यी फारम भरले व्हते . आता अरधाच दिवस कलास राह्ये . कलास सुटल्यावर परभ्या होसटेलवर अभ्यास करे . 
महासिवरातरीले कलास बंद व्हता , पर गावाले जाची मनाई व्हती . 
' उद्या सुट्टी आहे.... बाहेर जाऊ का आपण ? ' परभ्यानं कलासमंदी मंदारले पुसलं .
' बाबांना विचारावं लागेल ... त्यांनी परवानगी दिली तर जाऊया .' मंदारनं मनलं . 
' परंतु जायचे कशाने , हा प्रश्न आहे ..' परभ्यानं मनलं . 
' कुठे जायचा विचार करतो आहे तू ? ' मंदारनं डोरे किलकिले करत इचारलं .
' वडधामणा , सुराबर्डीला जाऊ . तेथे जायला बस सुध्दा आहे .' परभ्यानं झटक्यात मनलं .
' ठीक आहे , मी घरी बोलून तसा फोन करतो . ' मंदारनं ब्याग पाठीवर घेत मनलं . 
रातरी चवकीदारानं परभ्याले आवाज देल्ला . परभ्या समजला क मंदारचाच फोन असन मून . थो धावतच फोनजवर गेला . 
' हॅलो.... ' परभ्यानं मनलं .
' अरे मी मंदार .... उद्या आपण बसने जाऊ आणि घ्यायला बाबा येणार आहे . मंदारनं येका दमात मनलं . 
' ठीक आहे . मग उद्या कुठे भेटायचं ? ' परभ्यानं इचारलं .
' तू आधी घरी ये . मग बघू.....' मंदारनं जवाब देल्ला . 
सकारी परभ्या पायी पायीच मंदारच्या घरी गेला . ऊन कमी व्हती तरी चालू चालू परभ्या घामाजोकर झालता . मंदारच्या मायनं नास्त्याच्या पिलेटी आनल्या . 
' थोडा फराळ करून घ्या .' मंदारच्या मायनं मनलं .
' मी केला आहे.... आता नको .' परभ्यानं हरु आवाजात मनलं .
' केला तर केला ... घे बाळ , थोडं खाऊन घ्या .' मंदारच्या मायनं मनलं .
मंदार आन् परभ्यानं नास्ता केला . मंदारच्या मायनं येका झोऱ्यात पूंजापातीचं सामान देल्लं ; इतक्यात मंदारचे बाबा आले . 
' काय ! ... जायची तयारी झाली ? ' सोफ्यावर बसत बाबानं इचारलं .
' हो , बसने जाऊ .' मंदारनं मनलं .
' अरे बससाठी तुम्हाला बर्डीवर जावे लागेल . .. त्यापेक्षा कॅब बुक करतो आणि परतीला मला फोन करा . मी येईल . ' मंदारच्या बाबानं मोबाईलवर क्याब बुक करत मनलं . 
मंदारच्या मायनं दोन पान्याच्या बाटल्या देल्ल्या . क्याबनं वडधामन्याले सडकीवरच उतरवलं . तिथं लोकायची , दुकानायची भायीच गरदी व्हती . 
' आधी कुठे ? ' मंदारनं इचारलं .
' आधी सुराबर्डी ! ' परभ्यानं मनलं . 
दोघंयी पयदलच सुराबड्डीच्या सडकीनं निंगाले . सडकीच्या दोनी बाजूनं येनाऱ्या जानाऱ्या लोकायची गरदी , लहान पोरायपासून त् मथाऱ्या कोताऱ्या पावतर ! पुढं येन्ट्रीसाठी खूब लंबी लाईन !!
' आता काय करायचं ? ' मंदारनं लंबीचवडी लाईन पाहून इचारलं . 
' दुसरा अॉप्शन नाही . तिकिटे रांगेनेच घ्यावी लागतील . ' परभ्यानं मनलं . 
रांग मुंगीच्या पावलानं सरकत व्हती . पाय बी दुखाले लागले व्हते . पान्याच्या बाटल्या अरध्या खतम झालत्या . अडीच घंट्यानं तिकिटं भेटली . अंदर त ह्या गरदी... पाय ठिवाले जागा नोती . मंदार आन् परभ्या आंदी सावलीत बसले . अजून घोट घोट पानी पेलं .मंग महादेव पाराबतीच्या मोठ्ठ्या मूरतीकडं चेंगाले लागले . मंदारनं त्याच्या आईचा मोबाईल आनला व्हता . थो पटापट फटु आन् सेलफी काढाले भिडला . दोघायनं भुयारात जाऊन दरस्यन घेतलं . तिथून थे वापिस आले आन् हायल्यांड पार्कच्या मांगच्या बड्डावर चेंगले . वरतं माथ्यावर भोलेनाथाचं देऊर व्हतं . तिथं बी बंबाट गरदी व्हती . पायऱ्या चेंगून पोटऱ्या दुखाले लागल्या . जसे तसे चेंगले.... पूंजापाती केली आन् नारेल फोडला .खोबरं खात खात थे खाली उतरले . उतारावर कायी ठिकानी सवान जागा व्हती , तिथं आन् रस्त्याच्या काठानं रंगारंगीचे दुकानं लागले व्हते . लहानवाले अगासपारने कूं...कूं.. आवाज करत फिरत व्हते . चारीबाजू येकच कल्ला व्हता . सेव जिलबीच्या दुकानातून त्यायचा सुगंध नाकातून डोकस्यात चाल्ला व्हता . 
' जिलेबी घेऊ ? ' परभ्यानं इचारलं .
' चल घेऊया....' मंदारनं डोकसं हालवत मनलं . 
गरमागरम जिलेबी घिऊन थे येका दगडावर बसले . त्यायचे हातपाय गागऱ्यानं भुरे - पिवरे झालते . घाम त थांबाचं नावच नायी घेत व्हता . उरल्या सुरल्या पान्यानं चिकट हातं धुतले न तोंड पुसलं .. निरा गागराच गागरा ..!! मंदारनं बाबाले फोन केला आन् दोघं खाली उतराले लागले . पानी खतम झालतं .. खाली आईसकीरीमचे बी दुकानं दिसले . त्यायनं येक पान्याची बाटल अन् आईसकीरीम घेतले . आईसकीरीम खात खात थे सडकीवर आले . वडधामना - सुराबड्डीच्या फाट्यावरून मंदारनं अनखीन फोन केला . दोघंयी पार थकून गेलते . उलीसी कनकन बी वाटून रायली व्हती . मंदारच्या बाबाची कार आली . 
' तुम्ही जाता का दर्शनासाठी ? ' मंदारनं बाबाले पुसलं . 
' नाही.. खूप उशीर झाला आहे... चला घरी .' मंदारच्या बाबानं मनलं .
जाता जाता परभ्याले होसटेलवर सोडलं . परभ्या सीधा बाथरुमात घुसला . स्यावरखाली उभं राहून त्याले लय बरं वाटलं . रातरी परभ्याले सन्नाटून ताप आला . थो झोपीत च कनारुन यी रायला व्हता अन् बडबडत यी होता . उठल्याबराबर होसटेलचे पोरं त्याच्या पलंगाच्या भवताल जमा झालते . कलासचे गुरजी आले . त्यायनं चवकीदारासंगं परभ्याले दवाखान्यात धाडलं . 
परभ्याचं आंग इस्तवावानी जरुन रायलं व्हतं . तोंड बी कडू झालतं ...... त्याले झाव लागली व्हती.......  ( क्रमशः ) 

लेखक : इंजि . सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

Monday, March 1, 2021

नारी ( भोयरी कविता ). bhoyar culture _ भोयर संस्कृति. bhoyari dialect _ भोयरी बोली

नारी ( भोयरी कविता )
Bhoyar culture _ भोयर संस्कृति
Bhoyari dialect _ भोयरी बोली

माय सती को वारसो
गंगा ममता की नारी
देव देवांगन फिका
तूच चारी धाम पुरी ।१।

रूप कामधेनू धरे
पर तनखारो भारी
सीता लक्षुमी दुरगा
अवतार नवरात्री ।२।

हर नातो तोरो प्यारो
तूच कैकयी गंधारी
अपरमपार लीला
तलवार दुयधारी ।३।

घर द्वार तोरऽ पायी
तूच जीवन की मुरी
मोह्यरज की धनीन
तूच स्यहद की पुरी ।४।

वंस बेल को कलस
गुनवान तू हरारी
फुल वानी सकवार
करे सिंव्ह की सवारी ।५।

दुख हिरदा म धरे
सुख मुंडा प जर्तारी
घरदार को चैतन
नारी जीव चमत्कारी ।६।

मन सत तुरसी को
घर की मयाल नारी
अनपुरना को रूप
तूच पूंजा की चवरी ।७।

मनगट झनकार
बिल्लोर की कलाकारी
पायपट्टी पयजन
सरगम ला बी भारी ।८।

तोरऽ माथा क कुकू की
सूर्व्या पर स उधारी
भाई चंदर चादन्यो
दूर करस अंधारी ।९।

घिसे चंदन सरखी
कुपी अत्तर की न्यारी
उपे कपूर क वानी
गंध सुगंध की क्यारी ।१०।

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर