Friday, April 30, 2021

नाही घामाले किंमत ( वऱ्हाडी कविता ). varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

नाही घामाले किंमत
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

नाही घामाले किंमत
सारी बाबूगीरी चाले
गेल्या खपाटी पोटाले
टोचे मतलबी भाले ।१।

नाही घामाले किंमत
हात मातीतच वले 
पाह्ये करमाच्या किरा
जिनगानी भर येले ।२।

नाही घामाले किंमत
जग त्याच्यानच चाले 
पेते रगत पिसवा
झ्यंडा त्यायचाच हाले ।३।

नाही घामाले किंमत
सारे खोट्याचेच चेले
नेत्या बेपाऱ्याचं राज
हवा पानी बी इकले ।४।

नाही घामाले किंमत
किती पाखंडी बगले
आव सावाचा आनून
नड्ड्यालेच चिपकले ।५।

नाही घामाले किंमत
तन कस्टाचे येचले
नाही निसवलं सुख
गरभच नासवले ।६।

नाही घामाले किंमत
राजा बोले दल हाले
उभी रयत उपासी
देते टोल्यावर टोले ।७।

नाही घामाले किंमत
आड आसचे सुकले
कोड्ड्या पोह्यऱ्याचे नड्डे 
ठेंबासाठी तरसले ।८।

नाही घामाले किंमत
जिते मरनात गेले
डाग स्याईचे बोटाले
संगं सरनात गेले ।९।

नाही घामाले किंमत
किती रगत आटले
भाकरीच्या सपनाचे 
गाव चुलीत पेटले ।१०।

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

नाही का सांधून पाहू ( कविता ). Marathi language _ मराठी भाषा

नाही का सांधून पाहू
Marathi language _ मराठी भाषा

किती धावशील वेड्या
पायी पडतील बेड्या
गाव आपुलाच गड्या
नाही का थांबून पाहू ।१।

उष्ण श्वासाचे उसासे
ठाक कोरडी फुफ्फुसे
मति ग्रहणाचे फासे
नाही का लांबून पाहू ।२।

इच्छा उन्मत्त वारु
लोभ देखणा हा चारु
भाव भावना बाजारु
नाही का डांबून पाहू ।३।

रणी अविरत तांडे
भ्रम विलासाचे मांडे
महाप्रसादाचे भांडे
नाही का रांधून पाहू ।४।

ऋतू बंद वाडे नीच
सूर्य चंद्राला संकोच
घर चंद्रमौळी उगीच
नाही का बांधून पाहू ।५।

एक दुसऱ्याशी वाकडे
धर्म पंथाचे तुकडे
गेले विश्वासाला तडे
नाही का सांधून पाहू ।६।

रचना : इंजि . सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

सरवा भाग - २५. varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

सरवा - २५ 
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

परभ्याचा अभ्यास चालू व्हता . ६-६ मह्यन्यानं पेपर राहात व्हते . बदलापूरच्या सुनील संगं त्याची चांगलीच दोस्ती झालती . दोघंयी संगमंगंच राह्ये . हप्त्यातून येकडाव तरी परभ्या आन् मंदारचं बोलनं व्हये . सुनील आन् परभ्यानं इंजिनियरिंग म्याथेम्याटिकची सुरवातीपासूनच टिवस्यन लावली व्हती . दाआजीनं ल्यापटाप घिवून देल्ता . सुनीलजवर मातर पह्यल्यापासूनच ल्यापटाप व्हता . सोलापूरचा पोरगा कायी जास्त यायच्यात मिसरत नोता . थो येकला येकलाच राह्ये . परभ्याच्या गुरुपमंदी अवरंगाबादच्याच दोन पोरी बी व्हत्या . कनकचे दाआजी रेलवेत इंजिनियर व्हते त निधीचे दाआजी आन् माय झेडपीत मास्तर व्हते . येक दिवस सुनीलचा ल्यापटाप इचकला . परभ्या अन् सुनील ल्यापटाप दुरुस्त कराले दुकानात गेले . दुरुस्त करनाऱ्यानं ल्यापटाप दोन दिवस दुकानातच ठिवा लागन , असं सांगतलं . करन काय जवा वरतं झाले पाय ! दुसरा कायी उपाव बी नोता . दोन दिवस सुनीलनं परभ्याचा ल्यापटाप वापरला आन् त्याच्या जवरच्या हार्ड डिस्क मंदी सारं सेव्ह करून ठिवलं . परभ्या अन् सुनीलचं कालेजमंदी चांगलं नाव व्हतं . थे रात रातभर अभ्यास करे . 
परभ्यानं मायले विडिवो काल लावला . 
' बोल बापू.... जेवन झालं न ? ' मायनं अनमन्या भावानं इचारलं . 
' हव , जेवलो आताच अन् फोन केला . तू लय उदास दिसून रायली माय ..' परभ्यानं मायचा चेहरा पाहून मनलं . 
मायचे डोरे लाल लाल आन् सुजल्यासरखे बी दिसत व्हते . 
' का झालं माय ?' परभ्यानं कारजीनं इचारलं . 
' का सांगू बापू.... आपल्या पांढऱ्या बयलाले वाघानं मारलं रे....' मायनं रडत रडत सांगतलं . 
' असं कसं झालं ! येवढा गबर बयील मारला त्यानं .... दाआजी कुठं हाय ?' परभ्यानं इचारलं . 
मायनं दाआजीकडं मोबाइल देल्ला . सपरीत लोकं , गडीमानसं , सद्या न वस्या बी बसले व्हते . मांगं ह्याच पांढरा बयील परडला व्हता , पन त्याच्या ताकतीपुढं परडचं जह्यर बी हारलं व्हतं . अन् आता वाघानं त्याचा जीव घेतला मंजे कमालच झाली . 
' असा कसा मारला दाआजी आपला बयील वाघानं ?' परभ्यानं इचारलं .
' वाही चालू व्हती . मोठी जोडी नदीआंगच्या वावरात आन् लाह्यनी जोडी मांडवाच्या वावरात व्हती . भाकर खावासाठी मोठ्या गड्याले मांडवात जाचं व्हतं . त्यानं आऊत सोडला , नदीवर बयलं पानी पाजले आन् मोहाखालच्या बांधोडीवर जोडी बांधून , कडबा टाकून  मांडवात आला . दोनी गड्यायनं भाकर खाल्ली आन् गोस्टीमाता करत बसले . त्यायले नदीकडून बयलाचा हंबराचा आन् वाघाचा बी आवाज आला . दोघं बी तुताऱ्या घिवून तिकडं धावले . सिवारातले लोकं बी काड्या घिवून नदीकडंच धावत व्हते . जसी वाघानं पांढऱ्या बयलाची नड्डी पकडली तसं लाल्यानं खुटा उफडला आन् वाघावर धावला . पर तवर वाघानं पांढऱ्या बयलाची नड्डी फोडली व्हती ... सारीकडं रगतच रगत ! लाल्या बयील आन् लोकायले पाहून वाघ नदी नदीनं परून गेला....' सांगता सांगता दाआजीचे डोरे वले झाले . 
दोनी जोड्या घरच्याच गवराऊ गायीच्या व्हत्या . थे गोऱ्हे व्हते तवापासून परभ्यानं त्यायले पाह्यलं व्हतं . पांढऱ्या आन् लाल बयलाची मोठी जोडी हत्त्यावानी व्हती . गावा - सिवारातले सांडे बी त्यायच्या वाटी नायी जाये . पुऱ्या गावात ह्या बयीलजोडीचं नाव व्हतं . कोनाच्या बंड्या फसल्या त हेच जोडी थ्या बंड्या काहाडून दे . ताकतीले आरकाट असले तरी सोभावानं देवासरखे समझदार व्हते थे ! परभ्या दिसला त पांढरा बयील चरेच नायी . त्याले खाजवलं पायजे मून थो इरभर परभ्याच्या मांगं लागे . परभ्याच्या खूबच लाडाची हे बयीलजोडी लाखमोलाची व्हती . हरेक वावराचे , काटोल - कारंज्याचे रस्ते त त्यायले पाठ व्हते . त्यायचा ना कासरा वढा लागे ना त्यायले दपटा लागे . थे तिफनीचे आन् काकरीचे तासं त असे पाडे क जसं कागदावर इस्केलपट्टीनं रेघा फाडल्या मनन ! मानसायपरस यी समझदार जोडी व्हती थे !!
परभ्याचे डोरे बी गराले लागले . कवा गावाले जातो न कवा नायी , असं त्याले झालं .
' काय झाले प्रभाकर ?' परभ्याले रडतानी पाहून सुनीलनं इचारलं .
परभ्यानं पुरी रामकथा सांगतली . 
' दाआजी मी येऊ का गावाले ?' परभ्यानं दुनन फोन करून इचारलं .
' कायले कालेज न अभ्यास बुडवतं बापू ... जे झालं थे झालं... हे करमाचे भोग रायते . फारेस्टमंदी रिपोट केली व्हती . पंचनामा झाला हाये . पंचनामा झाल्यावर बयलाची सदगत केली . आमी आताच वावरातून आलो . मांडवातले ढोरं यी घरीच आनले हाये . ' दाआजीनं सांगतलं . 
परभ्याले आज कायी झोप लागली नायी . रातभर ह्या कडाचा थ्या कडावर व्हत रायला . पाह्यटी कवा डोरा लागला थे परभ्याले समजलंच नोतं . 
परभ्या वरगात यी चुपचापच व्हता . दुपारी सारे पोरं क्यांटीनमंदी गेले पन परभ्या वरगातच बसून रायला . निधीले यी परभ्यासाठी खराब वाटून रायलं व्हतं . तिले सुनीलनं थोडं बूत सांगतलं व्हतं . परभ्या ल्यापटाप उघडून बसला व्हता . अचानक त्याच्या खांद्यावर कोनीतरी हात ठिवला . परभ्यानं दचकून मांगं पाह्यलं . 
' काय झाले ?' निधीनं त्याच्याजवर बसत इचारलं .
परभ्यानं बयलाची गोस्टं सांगतली . 
' तू सकाळी पण जेवला नाही , असे सुनीलने सांगितले .  काय हे ! ' निधीनं आपला डब्बा टेबलावर उघडत मनलं .
' घे , काहीतरी जेऊन घे ...' निधीनं त्याचा ल्यापटाप बंद करून डबा त्याच्यापुढं करत मनलं .
' भूक नाही निधी ..' परभ्यानं खालच्या मानीनं मनलं . 
निधीनं त्याले जबरदस्तीनं जेवाले लावलं . परभ्यानं दोन चार घास खाल्ले . सुनीलनं त्याच्यासाठी फ्रूटी आनली . निधीनं डबा ब्यागमंदी ठिवला . कलासची घंटी वाजली . 
कालेज सुटल्यावर निधी न कनक परभ्याजवर आले . सुनील परभ्याजवरच उभा व्हता . 
' रात्री तुझ्यासोबत प्रभाकरला जेवायला लावशील . आणि हो , प्रभाकर जेवणाकडे अजिबात दुर्लक्ष करायचे नाही . उद्या मी सुनीलकडून तुझी माहिती घेणार आहे कळलं .. चला येते मी .' निधीनं कनकसंगं जात मनलं .
सुनील गालातल्या गालात हासत व्हता . 
' आता तुला काय झाले ?' परभ्यानं सुनीलले इचारलं .
' काही नाही.. असंच , चल .' सुनीलनं परभ्याच्या खांद्यावर हात ठेवत मनलं .    ( क्रमशः ) 

लेखक : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर 

Wednesday, April 28, 2021

अजब गजब - ६२ : वीर कुॅंवर सिंह. bhoyar culture _ भोयर संस्कृति. bhoyari dialect _ भोयरी बोली

अजब गजब - ६२ : वीर कुॅंवर सिंह 
Bhoyar culture _ भोयर संस्कृति
Bhoyari dialect _ भोयरी बोली

कहें राम कवित जैसे गरुढ़ गरब गहिअहिकुल दंडिमेटत घमंड है ।
वैसे ही कुॅंवर सिंह कीटत अमर मंडिफौज फिरंगिन की करी खंड - खंड है ।।
_ कवी रामकवि 

उज्जैनिया परमार घराना को भोजपुर इ मोठो गढ़ रह्ये . राजा भोज क बंस क येनऽ घराना को नाव दुनिया भर म परसिध्द स . 
बिहार क भोजपुर जिला म जगदीसपुर ला वीर कुॅंवर सिंह को १३ नवंबर १७७७ म जलम भये . कुॅंवर सिंह क दाआजी को नाव साहबजादा सिंह अन् माय को नाव पंचरतन कुंवर होतो . कुॅंवर सिंह का अमर सिंह , दयालु सिंह , राजपति सिंह इ नाना भाई होय .  इ घरानो स्याहाबाद ( आब को भोजपुर ) क मोठऽ जागीर का मालक होता . 
येन च खानदान का बाबू उदवंत सिंह , उमराव सिंह , गजराज सिंह बी नामी जागीरदार होता . 
वीर कुॅंवर सिंह को बिह्या राजा फतेह नारियां सिंह क पोटी संग भयोतो . 
हिंदुस्थान म पह्यली स्वतंत्रता की लढाई को आगाज इ.स. १८५७ म भयो . येकी चिनगारी बहादुर मंगल पांडे न सुलगायीती . वोनऽ बखत वीर कुॅंवर सिंह की उमर ८० बरस होती ,  पर हिम्मत नवजवान की आन् कलेजो सिंव्ह को होतो . इंगरज फऊज ला वीर कुॅंवर सिंह की ताकद को अंदाजो होतोच . वीर कुॅंवर सिंह आपली सेना , सेनापती मैकु सिंह आन् हिंदुस्थानी फऊज का मुखिया होता . 
२७ येप्रिल १८५७ ला दानापुर का सिपाई अन् भोजपुरी जवान संग लेय कन् वीर कुॅंवर सिंह न आरा प हमलो कऱ्ये . इंगरज को झ्यंडो काहाडकन आरा म आपलो झ्यंडो फडकाये . अंगरेज ला या हार खूब झोंबी . वून न खूब मोठो लावलस्कर लेय कन् जगदीसपु प हमलो कऱ्यो . वीर कुॅंवर सिंह अन् अमर सिंह ला आपली जलमभूमी सोडनी पडी . 
रामगढ़ का सिपाई संग लेकन वीर कुॅंवर सिंह जी न बांदा , रीवा , आजमगढ़ , बनारस , बलिया , गांजीपुर , गोरखपुर म इंगरज फऊज सिन लढाई कर कन् वून ला दानोफान कर डाये . 
आजमगढ़ परीन बिहार ला जान क बेरा वीर कुॅंवर सिंह जी गंगा नदी पार कर रह्याता . येकी भनक इंगरजना ला लागी आन् येक दल वहान पठाये . नाव म बस्या वीर कुॅंवर सिंह जी ला येक इंगरज सिपाई की गोली हात प लागी . वीर कुॅंवर सिंह जी न तुरुत वू हात तलवार कन् काटे अन् कट्या हात ला गंगा मि बहाये . 
२३ येप्रिल १८५८ ला जगदीसपुर जवर वून की इंगरज संग आखरी लढाई भयी . वा लढाई वीर कुॅंवर सिंह जी न जिती अन् वोन दिन च राजो मून वून को राज्याभिसेक भये . पर काटे वोनऽ हात म सेप्टिक भये . 
८० बरस उमर को इ रनबांकुरो २६ येप्रिल १८५८ ला येन दुनिया ला सोड कन् गयो . 
वीर कुॅंवर सिंह जी का समकालीन कवि ' रामकवि ' न वून की अद्भुत गाथा ला '  कुॅंवर विलास ' नाव क पुस्तक म लिख कन् राखेस . 
कवि तोफाराय न वीर कुॅंवर सिंह जी को ' कुॅंवर पचासा ' लिख्येस . 
२३ येप्रिल १९६६ म भारत सरकार न वीर कुॅंवर सिंह जी क नाव की डाक टिकिट निकारी . 
बिहार सरकार २३ येप्रिल ला ' विजय दिवस ' क नाव कन् मनावस . 

( सहयोग : इंजि . जालमसिंग सोढा जी , जोधपुर ) 
लेखक : इंजि . सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

Tuesday, April 27, 2021

अजब गजब - ६१ : यजीदी. bhoyar culture _ भोयर संस्कृति. bhoyari dialect _ भोयरी बोली

अजब गजब - ६१ : यजीदी
Bhoyar culture _ भोयर संस्कृति
Bhoyari dialect _ भोयरी बोली

मेसापोटोमिया अन् भारत क संस्कृती को संबंध पुरानो स . वा संस्कृती खतम भयी पर वकी निस्यानीना आब बी कोनतऽ न कोनतऽ रूप म देखन ला भेटस . १५०० बरस पह्यले इस्लाम धरम पयदा भयो अन् देखता देखता पसचिम आसिया , मध्य आसिया , उत्तर आफरिका म फयल्यो . पुरानऽ वयदिक धरम का , इरान का पारसी हिंदुस्थान म आया अन् बाच्या . पर कयी पुराना वयदिक धरम पंथ वाला मंझार म च फस गया , वोम को च येक ' यजिदी धरम '! यजिदी धरम ला पसचिम आसिया म को हारपे ती हिंदू धरम को पंथ मानस . 
इराक को उत्तर भाग , तुरकीस्तान को दकसिन भाग अन् सीरिया क पूरब भाग रवस यजिदी . वून ला कुरदी को उपसमुदाय मानस . आबऽ यजिदी लोग इराक , सीरिया , जरमनी , आरमेनिया , रूस म बी रवस . 
हिंदू धरम को पंथ यजिदी म दीपक , हवनकुंड , आरती , अभिसेक को चलन स . यजिदी हिंदू सरखाच समई , दिवो बारनो , कपार पर पवितर बिंदी ( कपार पर तेल सरखी चिज को टिक्को ) , पुनरजलम , मोकस्य , सकार सांज सूर्व्यदेव की पूंजा , हात जोडकन् नमस्कार , हवन , पूंजा पाठ , मुंडन , निराहार व्रत करस / मानस . जमीन , पानी , आग म थुकनो यजिदी धरम म वरजिक स . 
यजिदी लोग बांसुरी , सनई , डफ बजावस . 
यजिदी लोग ' कुरमांजी ' माह्या बोलस ज्या इंडो - इरानियन स्याखा की भास्या स . यजिदी लोग पिताजी ला दादा अन् माय ला अम्मी कोस . 
यजिदी लोग कब बी निरा रंग का कपडा नी पेहेरत . 
निसर्ग पूजक यजिदी लोगना का देऊर ठेठ हिंदू देऊर सरखा रवस . 
१ . यजिदी धरम की मान्यता : * यजिदी धरम मान्यता क अनुसार येनऽ धरम की परंपरा ६००० बरस पुरानी स . पसचिम अखंड भारत मिन यजिदी लोगना को इसापूर्व २/३ हजार बरस पह्यले स्थानांतरन भयो , असी मान्यता स . 
* भगवान न ( याज्दान = रचियता )  दुनिया बनाई अन् वोक देखभाल साठी वोला ७ इजिद ( फारसी शब्द - फरिस्ता देवता ) क हवालऽ करे . येम को परमुख इजिद ' मेलेक ताऊस ' ( मोर फरिस्ता देवता ) ! मोर इ अमरत्व को प्रतीक स . 
असल बात असी क इराक , सीरिया म मोर च नी . मोर सिरफ दकसिन आसिया म च सापडस . हिंदू धरम क कारतिक ( महादेव पाराबती को पोरग्यो ) , मुरुगन , सुब्रमन्यम को रूप इ ' मेलेक ताऊस ' ! मोर फरिस्ता देवता की दिन म ५ बेरा पूंजा करस . 
* ५/६ हजार बरस पासिन बिछड्या यजिदी लोगना पर इस्लाम , इसाई , पारसी धरम को भी असर दिसस . येतरऽ बरस पासिन बिछड्या बाद आजूबाजूको असर पडनो स्वाभाविक स . पर येतरा बरस भया , वून न मरन क भेव कन् बी आपरो धरम नी सोड्ये . 
* १२ वी सदी म यजिदी को धरमगुरू ' सेख अदी इब्न मुसाफिर ' न यजिदी धरम ला नवा नेम नियम बनायकन् अनखिन कप्पो बांध्ये . उत्तर इराक क मोसुल क उत्तर म अराफत पहाडी प ' लालीश ' यहान येनऽ महान धरमगुरू की समाधी स . यजिदी लोगना साठी लालीश को देऊर अन् इ स्थान हिंदू धरम क ' कासी ' सरखो स . समाधी को मुंडो सूर्व्यामुखी स . 
* यजिदी धरम म मुरीद , सेख अन् पीर या ३ जात स . वूई जात म च बिह्या करस पर येक गोत्र म बिह्या नी करत . बिह्या म लाडी हिंदू सरखो लाल स्यालू पेहेरस . बिह्या म वून को पंडित येक भाकर का दुय टुकडा करस अन् लाडा लाडी ला देस . 

* डिसेंबर मह्यना म  दिवा बार कन् दिवारी सरखो तिवार मनावस . ३ दिन का उपास धरस आन् वोन उपास ला दारु पेकन सोडस . 
* सप्टेंबर मह्यना क १५ पासिन २० तारीख पावतर वून की कासी ( लालीश ) म मोठी यातरा भरस . दुनिया भर का यजिदी लोग यहान आवस . वहान क नदी म न्हावस आन् दिवा बार कन् , आरती कर कन् पूंजा पाठ करस . 
* नवो साल यजिदी बेगर च तरीका कन् मनावस . येनऽ दिन वूई मोर भगवान ला घुमावस . सकार सांज पूंजा पाठ , आरती करस अन् तमाम लोगना संगऽ जेवस . 
* यजिदी धरम की सारी परंपरा ' मौखिक ' स . 
* लालीश क पवितर देऊर क दरुजा क जेवनऽ आंग  प नाग देवता की मूरती स . देऊर क अंदर दिवाल प समई संग साडी पेहेरी हिंदू बाई को मोठो चितरंग स . 
२ . यजिदी लोगना का हाल : * पुरी दुनिया म ५/७ लाख यजिदी धरम का लोग स . अगल बगल म कट्टर मुसलमान , अरब स . दुनिया म सबसिन जास्त बेरा यजिदी लोगना को नरसंहार भयो . ७३ बेरा वून को जातिसंहार भयेस . आतंकवादी लोगना न वून का ६८ देऊरना तोड्या . वून ला मुसलमान बनन साठी येतरो जुलूम कऱ्यो क वकी हद नी . आयसिस इ आतंकवादी संगठन जवान यजिदी बू बेटीना ला जबरदस्तीकन्  लिजास अन् तुमी बिचार बी नी कऱ्यो होयेन , येतरी नरक यातना देस ..‌ वून को नास करस . 
महान संस्कृती का धारक यजिदी लोगना न आपलो देस खोये ... नरक सरखा जुलूम झेल रह्यास ... किडा मुंगी सरखो वून को नरसंहार होय रह्येस ... पोटीबाटीना की इज्जत निलाम भय रह्यीस . 
धरम क नाव पर असो नंगोनाच चाल रह्येस . आपलऽ ६००० बरस पुरानऽ येनऽ भाईबंदना की कोनी ला च दया नी आय रह्यीस . 

लेखक : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर . 

महाबली हनुमंता. varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

महाबली हनुमंता
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली


असा काहून कोपला
माह्या बापा जगजेठी
आन दोरनागिरीले
देरे संजिवनी बुटी ।१।

महाबली हनुमंता
आता नको मारु सुट्टी
बेजा हयरान देवा
गुल झाली सिट्टी पिट्टी ।२।

आलं कोरोनाच्या आंगी
आता तूच जारे वाटी
हान आडवा तिडवा
कर भादरुन चाटी ।३।

खूब मासोंडला थो रे
हिसकली भाजी रोटी
कामा धंद्याले मनाई
अन्न कसं यावं ताटी ।४।

दाव तुवाला हिसका
कर लंबी गा स्येपटी
काढ मसकून असा
याद राखन कपटी ।५।

ठेव हात पाय भले
नको देवा तूप रोटी
दोन येळ दे पोटाले
भाजी भाकर आमटी ।६।

धाव मारुतीराया रे 
लागला कोरोना पाठी
धाड मसनात त्याले
सोडव मगरमिठी ।७।

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

Sunday, April 25, 2021

हनुमान जी की आरती. bhoyar culture _ भोयर संस्कृति. bhoyari dialect _ भोयरी बोली

हनुमान जी की आरती
Bhoyar culture _ भोयर संस्कृति
Bhoyari dialect _ भोयरी बोली

जय जय जय , मारोती महाबली ।
करूस आरती , करजे रखवाली ।। धृ.।।

अंजनीपुत की , महिमा मोठी न्यारी 
पवनसुत जी , बालाजी गदाधारी 
रुद्र अंस तुमी , अमर बलस्याली ।१।

राम भगत की , अजब बाल लीला
उड्या अगास म , खान ला सूर्व्य गोला
इंदर वज्जर , मार मुंडा प झेली ।२।

रावन करनी , सीता माय ला भोई 
वलांडे सागर , खबर तुमी ल्याई 
बारी लंका पापी , बिपदा असी टाली ।३।

स्यक्तीबान लाग्यो , तुमाला दुख भयो 
लछमन साठी , द्रोनागिरी ला ल्यायो 
कपि हनुमंत , सुरत भोली भाली ।४।

भगती को हिरो , सेवाभाव को मोती 
सीताराम जी की , हिरदा म बसती 
सेंदूर चढायो , सूर्व्यदेव की लाली ।५।

भूतखेत लाव , जवर नही आये 
बजरंग बली , नाव ला भजे गाये
सुरेस सिमरे , भर देवो जी झोली ।६।

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

Saturday, April 24, 2021

अजब गजब - ६० : सुरगाना संस्थान. bhoyar culture _ भोयर संस्कृति. bhoyari dialect _ भोयरी बोली

अजब गजब - ६० : सुरगाना संस्थान
Bhoyar culture _ भोयर संस्कृति
Bhoyari dialect _ भोयरी बोली

महाराष्ट्र क नासिक जिला म गुजरात राज्य क हद जवर ' सुरगाना संस्थान ' स . सह्याद्री की रांग सुरगाना तहसील मिन च चालू होस . सुरगाना क महादेव मुखऽ अन् पसचिम म गुजरात को आदिवासी जिलो डांग स . सुरगाना क देशमुख राजा को ' मोतीबाग राजवाडो ' आब बी स . 
१. इतिहास अन् मान्यता : * भगवान भोलेनाथ क १००८ नाव मिसिन येक नाव ' सुरगना ' स . देशमुख घराना को कुलदैवत बी भगवान भोलेनाथ स , तेकन येनऽ संस्थान ला सुरगना नाव देयो , असी मान्यता स . दुसरी मान्यता क अनुसार राजा श्रीमंत प्रतापराव देशमुख क दरबार म येक डाव गायक लोगना को जलसो भयो . वोमऽ येक गायक न असो साजरो गाये क राजा न ' निंबारघोडी ' क जागा प ' सुरगाना संस्थान ' इ नाव देयो . साडेतीन स्यक्ती पीठ म को येक ' सप्तश्रृंगी ' देवी . या देवी माय ' देशमुख कुर ' की कुलदेवी . सुरगाना परीन ८ कि.मी. पर हतगड किल्लो स . 
गुजरात क डांग इलाखा म क १४ संस्थान की  ' सुरगाना संस्थान ' राखन करत होता . इ १४ संस्थान अन् भदर को संस्थान ' सुरगाना संस्थान ' क अधिकार म होता . 
दख्खन मिन सुरत ला जान को बेपारी रस्तो सुरगाना परिन च जात होतो . 
* १३ व सदी म मालवा परीन परमार बंस का देशमुख यहान आया अन् सुरगाना ला आपली राजधानी बनाई . 
* सुरगाना परीन ५/६ कि.मी. दूर ' भदर संस्थान '  बी येन च देशमुख पाती को होतो . 
* भदर संस्थान म माधवराव , यशवंतराव , आनंदराव , नारायणराव इ श्रीमंत देशमुख राजाना भया . 
* सुरगाना संस्थान न पेशवा अन् मुघल सरदार डोंगर खान ला बी हारायतो . सुरगाना संस्थान कोनी क बी आघ हार नी मानत होतो . तेकन सुरगाना संस्थान ला ' बंदी मुलुक ' कवत होता . 
* इ.स. १८६० म ईस्ट इंडिया कंपनी अन् सुरगाना संस्थान मंझार समझोतो भये . 
* सुरगाना संस्थान :
१८१८ - १८१९ : श्रीमंत मल्हारराव देशमुख
१८१९ - १८२० : श्रीमंत भीकाजी देशमुख
१८२० - १८५४ : श्रीमंत यशवंतराव देशमुख
१८५४ - १८६७ : श्रीमंत मुवरराव देशमुख
१८६७ - १८९८ : श्रीमंत प्रतापराव शंकरराव देशमुख
१८९८ - १९३० : श्रीमंत प्रतापराव देशमुख
१९३० - १९४९ : श्रीमंत धैर्यशीलराव देशमुख
* इ.स. १९४९ म सुरगाना संस्थान भारत म सामिल भये . १९४९ म सुरगाना संस्थान की सालाना ट्याक्स की कमाई रु . ६००९२ / होती . संस्थान भारत म सामिल भया बाद देशमुख राजा ला रु. ३००००/ कोई प्रिवीपर्स भेटत होतो . 

( सहयोग : इंजि . जालमसिंग सोढा , जोधपुर ) 
लेखक : इंजि . सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

Thursday, April 22, 2021

अजब गजब - ५९ : शकुंतला बारंगे. bhoyar culture _ भोयर संस्कृति. bhoyari dialect _ भोयरी बोली

अजब गजब - ५९ : शकुंतला बारंगे 
 Bhoyar culture _ भोयर संस्कृति
Bhoyari dialect _ भोयरी बोली

लहरों से डर कर नौका कभी पार नहीं होती
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ।
_ हरिवंशराय बच्चन 

वरतऽ क कविता की लाईन संग जिंदगानी चल्या रह्या लोगना समाज साठी प्रेरना स . वून म की च येक स , शकुंतला बारंगे !
मुक्काम राहाटी , पो . काजरी , तह्यसिल कारंजा , जि. वर्धा येनऽ खेडा म भाऊरावजी लहानुजी बारंगे अन् सौ . अन्नपूर्ना भाऊरावजी बारंगे की दुसरी पोटी जलमी वा शकुंतला ! तारीख १६ डिसेंबर , १९६७ ला शकुंतला को जलम भये . गरीब कुटुम्ब म खुसी आयी , पर या खुसी येकच बरस रह्यी . दुसरऽ साल शकुंतला अपंग भयी . पोलियो सरखऽ बिमारी कन् वका दुय बी हात बेकाम भया . चेहरो बी हेकोडो भयो . शकुंतला जसी जसी मोठी होन ला लागी , उसी वोला बोलन ला बी तकलिफ होन ला लागी . वोला आज बी बराबर बोलता नी आवत . कुटुम्ब पर मुसीबत को पहाड पड्यो . 
येनऽ कुटुम्ब की पह्यली पोटी चंदरकला हातपाय कन् चांगली होती , सिरफ शकुंतला च अपंग भयीती . कुटुम्ब म अनखिन तीन भाई अन् येक बहिन को जलम भयो . घर की पयसा अदला की  हालत तोरा मासा , वोमऽ बहाडे कुटुम्ब ... येनऽ हालत म शकुंतला को इलाज कसो अन् काय कन् करेन ? कुटुम्ब न आपरो भाग समजे . १५ बरस की होत पावतर शकुंतला को रोज को काम आन् देखभाल माय न करी . सिकस्यन पानी को सवाल च नी होतो . कुटुम्ब अन् माय या च शकुंतला की दुनिया होती . पर बाद म चमत्कार भयो . शकुंतला ला समज आवन ला लागी . दुय हात बेकाम , लुला होता त शकुंतला हात का काम पाय कन् करन ला लागी . सबन ला खूब खुसी भयी . जेवनो , न्हावनो , कपडा धोनो , येनीफनी करनो , दात घासनो , कपडा पेहेरनो , बटन टाकनो , भाजी करनो , सडो सारवन करनो , सयपाक करनो , भांडाना धोनो असा काम शकुंतला पाय कन् करन ला सिखी . लोगना इ चमत्कार देखन ला आवन लाग्या . घर म हासीखुसी को वातावरन भयो . 
शकुंतला की काम करन की जिद देख कन् शकुंतला का दाआजी भाऊरावजी न करजो लेय कन् घर म च वला किरानो दुकान डाय कन् देये , कुटुम्ब का बाकी लोगना होता च सहारा साठी ! पाय कन् दोरो गुंड कन् पुडा बांधनो , किराना सामान देनो असा काम वा करन ला लागी . अनपढ शकुंतला अनुभव कन् हिसोब बी बराबर करन ला लागी . गिराइक सामान लेकन शकुंतला ला आसिरवाद देता . आब शकुंतला की हिम्मत बाहाडी . गाव क कई पोटीना संग वकी दोस्ती भयी . 
शकुंतला की असी च येक सोबतीन होती , आशा परतेकी . आशा ला वरोरा क आनंदवन की जानकारी होती . वहान अंधरा , अपंग भाई - बहिनना ला सिकवस या बी जानकारी आशा ला होती . आशा न बारंगे कुटुम्ब सिन बात करी अन् शकुंतला ला लेय कन् आनंदवन ला आई . आब आनंदवन म येकली पोटी कसी रह्येन , इ मोठो सवाल होतो . मातर शकुंतला न आनंदवन म रवन की जिद पकडी . वून न अपंग लोगना क वरकस्याप साठी फारम भऱ्ये अन् तारीख १ जुलाई २००१ ला शकुंतला ला हस्तकला विभाग म याडमिसन भेटी . 
होस्टल म वकी कारजी कोन लेयेन , रोज क काम म वोला कोन मदद करेन ? इ सवाल त होता च ! पर शकुंतला तमाम काम पाय कन् करस अन् वकी हिम्मत तगडी स , इ देख कन् अधिकस्यक सदासिव ताजने अन् आनंदवन म्यानेजमेंट न हिम्मत बांधी ! आनंदवन को तत्त्व स , ' टाकाऊ पासिन टिकाऊ '! येकऽ अनुसार शकुंतला ला हस्तकला को गुरजी रमेश अम्रु जी न सिखाये . स्यून्य मिन दुनिया बनावन को काम सुरू भये . दोरा ( धागा ) कन् गीरीटींग कारड ( भेट कार्ड ) बनावन म शकुंतला हुस्यार भयी . 
शकुंतला क टेरनिंग क बखत सदासिव ताजने जी न शकुंतला ला बाप सरखो संभाले . आघऽ वकी बाबासाहेब आमटे अन् माई संगऽ भेट भयी . डॉ विकास आमटे जी की बी  शकुंतला संग  भेटभलाई भयी . शकुंतला क टेरनिंग , खानपेन , रवन म कोनती बी कसरि नी रह्या पाह्यजेन , असो वून न सांगे . 
असऽ परकार कन् शकुंतला पाय कन् सुई म दोरो डाय कन् कारड पर डिझाईन काहाडकन् , रंगी बेरंगी दोरा बापर कन् , गनपती , फिफोली असा कयी गीरटींग बनावन ला लागी अन् वको नाव होन ला लागे . 
आनंदवन म आवनी वालाना म आपलऽ कलागुन कन् शकुंतला परसिध्द भयी . वोला समकस्य काम करता देख कन् लोगना को हिरदो भर कन् आवत होतो . शकुंतला को चेहरो  नानऽ पोटुवानी हासरो स . बिक्या गीरटींग कारड का वा बराबर हिसोब धरस . 
येक डाव शकुंतला संग येक घाडी च खराब दूरघटना भयी !..... गीरटींग कारड बनावन क बेरा वोक पाय म सुई खुपसी . इलाज कर कन् देख्या पर सुई पाय मिन निकरी च नी . आठ मह्यना वा सुई शकुंतला क पाय म रह्यी , मातर वोकऽ चेहरा पर दुख दरद को नाव नी होतो . शकुंतला न  सारो दुख दरद भगवान  महादेव सरखो गरा म ( मन म ) च धरे ... वोला चेहरा प  आवन नी  देये . वा दवाखाना म जान ला राजी नी होती . या गोस्ट होत होत डॉ विकास आमटे जी ला समजी . वून ला धक्को च लागे . वून न ततकाल गाडी कर कन् शकुंतला ला सेवाग्राम क दवाखाना म पठाई . वहान आपरेसन कर कन् वोनऽ सुई ला काढी . 
शकुंतला ला आब आनंदवन म २० बरस भयास . वा जरी राह्यटी गाव की स पर आबऽ वको घर आनंदवन च बनेस . २०१४ म शकुंतला की मह्यना काठऽ कमाई होती १५००/ रुप्या ! आपलऽ कमाई कन् शकुंतला कुटुम्ब ला मदद कर कन् घर सहारो बनीस . 
शकुंतला क गीरटींग कारड की मोठी डिमांड रवस . वा कपडा प पाय कन् च पेंटिंग बी करस . 
इ.स. २०१४ म लेखक डॉ . गोविंद कासट जी न ' श्रध्येय बाबा आमटे यांच्या आनंदवनातील एक संघर्षमय जीवन शकुंतला बारंगे ' येन नाव कन् मराठी म २५ पान को नानोसोऊ पुस्तक लिख्येस . 
सुदा हातपाय रव कन् बी आमी नसीब ला दोस देऊस . पर अनपढ , दुय हात लुला अन् बोलना म  तकलिफ रह्य कन् बी शकुंतला न जीवन जगनो सिख्यो ! आपलऽ पाय प उभो रव कन् दिखाडे . अन् खुद डटी रही च पर घर को बी आधार बनीस . 
शकुंतला की हिम्मत , मुंडा प हासू , मन म बिसवास अन् पाय की कला ला नमन करुस ...

लेखक : इंजि . सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर 

Wednesday, April 21, 2021

अजब गजब - ५८ : परीस्तान bhoyar culture _ भोयर संस्कृति. bhoyari dialect _ भोयरी बोली

अजब गजब - ५८ : परीस्तान
Bhoyar culture _ भोयर संस्कृति
Bhoyari dialect _ भोयरी बोली

नानपन आजी - बय न सोवन क बेरा परी , राजकुमार की घाडी कथा सांगीती . वून की कथा खतम होन क पह्यले च कब डोरा लागत होता , इ ठाव बी नी पडत होतो . पर येक खरो अन् मोठो साजरो देस होतो , जे को नाव ' परीस्तान होतो . आब क पाकिस्तान अन् अफगानिस्तान क महादेव मुखऽ हिंदू कुस नाव को हिमालय सरखो परबत स . वो क वरतऽ क आंग बाल्ख ( बाल्हिक ) देस आन् खलतऽ क आंग परीस्तान देस होतो . 
आब क हिसाब कन् पाकिस्तान क खयबर पख्तुनख्वा इलाखा को चितराल जिला अन् अफगानिस्तान को नूरिस्तान इलाखो येम च परीस्तान होतो . इ.स. १८९३ म डुरंड लाइन कन् अफगानिस्तान भारतसीन बेगरो भयो उसो च परीस्तान बी दुय फाड भयो . 
आब तुमाला सवाल पड्यो होयेन क , येनऽ परीस्तान म कोन लोग रव्हत होता , को को राज होतो आन् आब वहान की हालत का स ?!.... सांगूस .... येकेक करकन् ..
१ . परीस्तान का लोग : भुरा , पिवरा बाल , निरा - हिवरा डोरा आन् गोराचिट्टा रंग का ' कलाश / कलश ' जनजाति को इ इलाखा .  परी सरखी सुंदर यहान की बाईलोग ! इ वंस इंडो - ग्रीक होयेन , असी मान्यता स . पाकिस्तान क चितराल जिला म ४००० आन् अफगानिस्तान क नूरीस्तान म १३०००० ' कलश ' लोग बाच्यास . ' कलश ' जनजाति म मातृसत्ताक कुटुंबपद्धती स . बाई घर की मालकीन रवस . यहान की बाईलोग खुद आपरो लाडो निवडस . खेत को काम , भेडबकरी चरावन को काम , लेनदेन बाईलोगना च करस . परीस्तान को धरम रुगवेद कार को पुरानो हिंदू धरम स . इ ' कलश ' भास्या बोलस . बाई ,  मानुस , पोटुबाटुना हात क कढाई वाला रंगीत कपडा पेहरस . बाईलोग क डोकसा पर अनोखी रंगीत ताज सरखी टोपी रवस . कोनी क मरन प ' कलश ' लोगना रोवत नी . बाई , मानुस संग च दारु पेस . संगीत , नाचगानो - बजावनो इ इन की परंपरा स . डरम आन् बासरी इ संगीत को मुख्य साधन स . ' कलश ' संस्कृती म मूरती पूंजा अन् बली परथा स . पोटुबाटू का नाव घर म काम आवन वालऽ अवजार , सामान पर धरस . जसो बालटी , कुकर , काम्पुटर....
२. इतिहास अन् मान्यता : * पसचिम अखंड भारत पर मुसलमान , तुरक ,  मंगोल का कयी हमला भया . जोर जबरदस्तीकन् लोगनाला मुसलमान बनावनो चालू भयो . पर इ.स. १८५९ पावतर इ देस गुलाम नी भयो . बेगरो चेहरो , बेगरो धरम होन क कारन हमलावर लोगना परीस्तान ला ' काफिरिस्तान ' कवनला लाग्या . 
* ' कलश ' लोगना सिकंदर क फऊज का बंसज होय , असी मान्यता स . अन् ' कलश ' आर्य वंस का स , असी बी मान्यता स.
*  परीस्तान न १५ वी सदी म तयमुरलंग ला हारायतो . वून क भेवकन् बाबर अन् चंगेजखान वूत गया च नी . 
* महमूद गझनी न मातर यहान मोठा हमला कऱ्या , मारकाट - तोडफोड करी . यहान का सबन मोठा देऊरना तोड्या अन् ' कलश ' को सबसिन पवितर मंतर लिख्यो दगुड संग लेकन गये . 
* इ.स. १८९३ म डुरंड लाइन कन् अफगानिस्तान बन्या बाद इ.स. १८९५ /९६ आमिर अबदुर रहमान खान न परीस्तान ( काफिरिस्तान ) प खूब मोठो हमलो कऱ्यो . वहान तमाम ' कलश ' लोगना ला मुसलमान बनाये . 
* आब क पाकिस्तान म सिरफ चितराल जिला म च परीस्तान बाचे . पर आब वू बी गुलामी म आये . पाकिस्तान बन्या बाद त 'कलश' प खूब जुलुम भयो . इ.स. १९७० - १९८० येन कार म ' कलश ' लोगना को घाडोच इस्लामीकरन भये . पहाडी पुहाडी म लुक्या ती च बाच्या . ' कलश ' लोग परंपरा का कट्टर स . कोनी बी येक डाव बाट्या प वोला धरम म वापिस नी लेस . 
* ' कनिष्क अन कुषाण ' राज क बास्त यहान ( परीस्तान ) म ' कलश ' राज आये जी इ.स. १८५९ पावतर होतो . 
* अफगाणिस्तान क तमाम ' कलश ' ला त मुसलमान बनाया च पर पाकिस्तान म बी वून की धूरधानी भयी . इ.स. २०१८  म पाकिस्तान न बाच्याता वोनऽ ' कलश ' लोगना की पह्यली  सिरगिनती करी . तब चितराल जिला क पहाडी तीन गाव म वूई ३८०० बाच्याता . ' आंतरराष्ट्रीय ' दबाव क कारन वून क धरम , परंपरा ला बाचाडनो या पाकिस्तान की जिम्मेवारी स . 
२. ' कलश ' लोगना की देव देवता : * ' कलश ' लोग इंदर ( इंद्र ) , यम , मार देवता की पूंजा करस . 
* हिंदू कुस परबत प सबसिन उच्ची चोटी पर ' कलश ' की ढोर डंगर , खेतीबाडी , फसलपानी की रखवाली करनी वाली 'कुशमाई ' देवता स . 
* संतान उतपत्ती की देवी " निर्माली " की ' कलश ' लोग पूंजा करस . 
* कब बी अन् कोनी की बी पूंजा कन् परसन्न होय कन् वकी राखन करनी वालऽ देवता को नाव स " महानदेवु "! ( महादेव ).
* इन क लोककथा को आदिपुरुस ' सलाकश ' स . ( सेल्युकस ) 
* लोककथा क आदिपुरुस को स्थान ' श्याम ' स . 
* ' कलश ' लोग देवता ला कबऽ दूध चढावस अन् कबऽ बली देस . 
३. ' कलश ' संस्कृती का तिवार : * ' कलश ' संस्कृती म मुख्य  तीन तिवार स . 
अ) चेमॉस / चौमास ( चतुर्मास ) - इ सबसिन मोठो तिवार डिसेंबर मह्यना म १४ दिन को रवस , आपलऽ दिवारी सरखो ! इ तिवार देऊर ( जेस्तेकन ) , खुली जागा , घर अन् आवार म मनावस . येनऽ तिवार म पोटीना आपरो लाडो निवडस . 
आ ) चिलम जोशी - इ ४ दिन को तिवार बसंत रितू ( मई मह्यना म ) म मनावस . 
इ ) उचावू - इ तिवार उनारा अन् हिवारा क मंझार सप्टेंबर मह्यना म मनावस . 
४. ' कलश ' भास्या : ' कलश ' भास्या इंडो - आर्यन भास्या कुल क दार्दी स्याखा की स . 
 # '  कलश शब्द '  - अथी , अठी =  अस्थि ( संस्कृत ) , हड्डी ( हिंदी ) 
# ' कलश शब्द ' - मुत्र , मूत्र = मूत्र ( संस्कृत ) , मूत्र , मूत ( हिंदी ) 
# ' कलश शब्द ' - ग्रोम = ग्राम ( संस्कृत ) , ग्राम , गॉंव ( हिंदी ) 
# ' कलश शब्द ' - रजूक , रझूक  = रज्जू ( संस्कृत ) , रस्सी , लेजुर ( हिंदी ) 
# ' कलश शब्द ' - धुम = धूम ( संस्कृत ) , धुअॉ , धुवॉं ( हिंदी )
# ' कलश शब्द ' - मोस = मांस ( संस्कृत ) , मांस , मास ( हिंदी ) 
# ' कलश शब्द ' - शुआं , शोआ = श्वान ( संस्कृत ) , कुत्ता , सुवान ( हिंदी ) 
# ' कलश शब्द ' - पिलिलक = पिपिल , पिप्पीलिक ( संस्कृत ) , चींटी , पिपरा , पिपडा ( हिंदी ) 
# ' कलश शब्द ' - पुत , पुत्र = पुत्र ( संस्कृत ) , पुत्र , पूत ( हिंदी ) 
# ' कलश शब्द ' - द्रिग = दीर्घ ( संस्कृत ) , दीर्घ , दीह ( हिंदी ) 
# ' कलश शब्द ' - अष्ट , अश्त = अष्ट ( संस्कृत ) , आठ ( हिंदी ) 
# ' कलश शब्द ' - छिना = छिन्न ( संस्कृत ) , छिन्न भिन्न , टूटा ( हिंदी ) 
# ' कलश शब्द ' - नाश = नाश , नाशयति ( संस्कृत ) , नाश होना , जान से मारना ( हिंदी ) 

इतिहास क कालचक्कर म केती संस्कृती पयदा भयी अन् नास बी भयी . केतरी बी मरन लाईक भयंकर इपदा , परिस्थिती आई तब बी आपलऽ संस्कृती ला बाचाडन को , वको जतन करन को काम आपलो च स . 

लेखक : इजि . सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर



Sunday, April 18, 2021

कोरोना varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

कोरोना
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

करोनानं इचिबिन
बेजा कहरच केला
चुली ठंड्या गा रान्नीत
आंगी ताप भायी आला ।धृ।

कामधंदे बह्यकले 
सारा झोलझाल झाला
नाही खडकू खिस्यात
जीव आदमुस्या आला ।१।

बंदी बाहेर फिराले
साल घरात काढला
कोरोनाची गा कुसरी
दायदाना उपिजला ।२।

गेले पटापट जीव
भाव सरनाले आला
झाले दवाखाने फुल्लं
पैसा कामी नाही आला ।३।

नाही जल्मात पाह्यला
महामारीचा झ्यमेला 
किड्या मुंगीवानी गेला
जीव कालचा चांगला ।४।

दुखवटा तेरवीचा 
बंद झाला दादा खेला
आसू इरले डोयात 
हासू परदेसी गेला ।५।

घर बनलं गा जेल
मेल मिलाप सपला
मन कुइजलं असं
भाव बजारी खपला ।६।

असा कसा रे धिंगाना
कोन्या जलमाचं पाप 
किती जीव गेल्यावर
देवा भरे तुह्यं माप ।७।

रचना : इंजि . सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

Saturday, April 17, 2021

सरवा - भाग २४. varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

सरवा - भाग २४
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

' जेऊन रायला का बापू ?' सद्यानं सपरीतूनच इचारलं . 
' आलो , आत्ताच जेवन झालं . बोल काय मनतं ?' परभ्यानं रान्नीतून सपरीत येत मनलं . 
' झाली का तुह्यी याडमिसन ?' वस्यानं मंधीच इचारलं . 
' हव , झाली न ... तिथच होस्टल बी हाये पर अवरंगाबाद लय दूर हाये बावा !' परभ्यानं सांगतलं . 
' महारास्टातच हाये न ! सुट्ट्यात त येत जासीनच न गावाले .' सद्यानं मनलं .
' येत जाईन न ... पन असा काहून इचारतं ?' परभ्याचा सवाल .
' ह्या दोन वर्सात तू नाप्पूरले व्हता त जास्त भेटीगाठी झाल्या नायी . तुले भेटलं क लय हलकं हलकं आन् चांगलं वाटते बापू . तुह्याच्यानं आमची बी कालर टाईट रायते गावात . आमाले भूलजो नको..' सद्यानं मनलं .
बोलता बोलता सद्याचा गरा दाटून आला . परभ्यानं काम्पुटरवर त्यायले आपलं कालेज दावलं . सद्या न वस्या कवतिकानं पाहात व्हते . 
दिवस भरभर सरले . परभ्याचा अवरंगाबादले जाचा दिवस आला . गावातला येक टेम्पू भाजीपाला घिऊन काटन मारकेटले जानार व्हता . परभ्या अन् दाआजी थ्याच टेम्पूत जानार व्हते . पाह्यटीच मायनं सयपाक केला . माय रातभर झोपली नोती . सद्या , वस्या , गडीमानसं , कायी येटारातले लोकं झुंझुरकापासूनच आवारात बसून व्हते . गल्लीत टेम्पूचा पोंगा वाजला . गडी परभ्याची सुटकेस अन् सद्या ब्याग घिऊन दरुज्याजवर गेले . माय तोंडावर सेव घिऊन उभी व्हती . परभ्यानं मायचे पाय लागले ; तसं मायनं परभ्याले कवटारलं अन् पटापट मुके घेतले न लडाले लागली . 
' चांगला राह्यसीन मा . रोज सांजच्याले फोन करत जाजो . खानंपेनं बराबर करजो .... माह्यं लेकरु... माह्या बापू....' माय लडत बी व्हती आन् बोलत बी व्हती . 
मायच्या बोलन्यानं परभ्याच्या डोऱ्यात बी आसू आले . 
' चाल रे बापू लवकर .' दाआजीनं आवाज देल्ला .
मायनं परभ्याचा चेहरा आपल्या सेवानं पुसला आन् त्याले घिऊन आवारात आली . तिचे आसू त थांबाचं नावच घेत नोते . 
' माय तू लडू नको....' परभ्यानं मायसंगं चालत मनलं .
' नायी रे लेकरा... चाल.. चाल..' मायनं डोरे पुसत मनलं .
गड्यानं सुटकेस अन् ब्याग टेम्पूच्या डाल्यात टाकली . परभ्याचे दाआजी टेम्पूत बसले . माय परभ्यासंगं टेम्पूजवर आली . रस्त्यावर लोकं जमा व्हते . परभ्यानं दुनन मायचे पाय लागले अन् टेम्पूत बसला . मायनं त्याच्या डोकस्यावरून हात फिरवला . सद्या न वस्या बी खिडकीजवर आले . डायवरनं पोंगा वाजवला तसं टेम्पूपुढचे लोकं मांगं सरकले . 
' येतो माय..' परभ्यानं हात हालवत मनलं . 
टेम्पूत उदबत्तीचा सुगंध मह्यकून रायला व्हता . अंधारावर लाल लाल साय पडून रायली व्हती . पाखरायचा कलकलाट चालू झालता . परभ्या दाआजीचा हात पकडून बसला . डायवरनं गाने लावले... 
टेम्पूनं परभ्या आन् दाआजीले रेलवे ठेसनच्या काटन मारकीटवाल्या गेटजवर उतरवलं . परभ्या अन् दाआजी रातरी अवरंगाबादले पोचले . रातरी हटेलात थांबून सकारीच कालेजमंदी गेले . लय पोरं आले व्हते . थे मंग होस्टलमंदी गेले . परभ्यानं आपला रुम नंबर पाह्यला . येका रुममंदी तीन बेड व्हते . परभ्यानं खिडकीजवरच्या बेडवर आपली ब्याग ठिवली . त्याच्या रुममंदी येक बदलापूरचा पोरगा व्हता . याडमिसनच्या टायमाले परभ्यानं त्याचा नंबर घेतला व्हता . परभ्यानं त्याले फोन केला त त्याले याले अजून येक दिड घंटा टाईम व्हता . परभ्याच्या दाआजीनं पान्याची बाटल काहाडली , तवाच येक पोरगा त्याच्या दाआजीसंगं रुममंदी आला . परभ्याच्या दाआजीनं रामराम केला . थो पोरगा सोलापुराहून आलता . परभ्यानं आडव्या बेडजवर सामान ठिवाले सांगतलं . काही टायमानं चवघंयी कालेजच्या क्यांटीनकडे गेले . नास्ता केला अन् वापिस रुममंदी आले . बदलापूरवाला पोरगा बी आला . घंट्याभरातच तीघयी सोबती झाले . 
' आमी येतो बापू .' परभ्याच्या दाआजीनं मनलं .
आतापावतर हासीखुसीत असल्या परभ्याचा चेहरा झरकन उतरला . 
' तीघयी भावासारखेच रायजा पोरं हो..' परभ्याले पोटासी धरून दाआजीनं मनलं .
दाआजी गेल्यावर परभ्यानं आपलं सामान बराबर लावलं . उद्यापासून कालेज चालू व्हनार व्हतं . तीघयी कालेजच्या आवारात फिरले . रातरी क्यांटीनमंदी जेवले . परभ्यानं मायले विडिवोकाल लावला . आपली रुम दावली अन् आपल्या सोबत्यायसंगं बी बोलाले लावलं . जेवल्यापासून तीघयी मोबाइलवरच व्हते . सोबती झोपले पन परभ्याचा डोरा कायी लागला नायी . कालेज चालू झालं .
दिवारीत परभ्या गावाले आला . माय त इरभर परभ्यासंगंच ! , पोरासाठी काय जेवाले रांधू न काय नायी , ह्याच धुंदीत ! 
परभ्यानं दाआजीजवर ल्यापटापची गोस्टं काहाडली . 
' कितीक रुप्याचा व्हयीन रे बापू ?' दाआजीनं इचारलं .
' पन्नासक हजारापावतर व्हयीन वाटते .' परभ्यानं सांगतलं .
' बरं बरं.. मी करतो कायी जुगाड . ' दाआजीनं परभ्याले थोपटत मनलं . 
सद्या न वस्याचा त परभ्याच्या घरी मुक्कामच व्हता . 
' का मनते तुह्या बकऱ्या ?' परभ्यानं इचारलं .
' बकऱ्यायले का व्हते... चांगल्या हाये . मांगं येक बकरी कुबड्यानं खाल्ली . ताल हाये सगरा....' सद्यानं मनलं .
' कुबड्या आन् आपल्या सिवारात ?' परभ्यानं अचंब्यानं मनलं .
' कुबड्याचं सोड आता , वाघं बी सुटले हाये बावा ढग्याच्या जंगलात .' वस्यानं अजून अचंब्याचा येक बाम्ब टाकला . 
' थ्या डोहाकडच्या सिवारात त मांडवातले वासरं खाल्ले वाघानं . आता मांडवात ढोरं ठिवाची बी उजागरी नायी रायली . वाघाच्या भेवानं गडीमानसं जागली बी जावाले नायी पाहात . ' सद्यानं सांगतलं . 
' हे त लयच झालं . आता हे जनावरं कसे पयदले ?' परभ्यानं मनलं .
' सरकारनं सोडले हाये मनते बावा वाघं जंगलात .' वस्यानं सांगतलं . 
' मी बकऱ्या बी गावाच्या जवरच चारतो आन् झाल पडाच्या आंदीच घरी आनतो . ' सद्यानं मनलं .
' थे जाऊ दे बापू ... काय मनते तावलं कालेज , कालेजचे सोबती ?' वस्यानं गोस्टं बदलवत इचारलं .
' सोबत्यायचं का इचारतं बह्याडा ... सोबतीनीचं इचार !' सद्यानं वस्याले डोरा मारत मनलं .
' भयताड हाये का रे ... मायले आयकू गेलं त का मनन ?' परभ्यानं दटावत मनलं .
' हरुच त मनलं बावा ... चाल आंगनातल्या पडवीत बसू .' सद्यानं मनलं .
तीघं यी पडवीत आले . परभ्यानं मोबाइलमंदी आपले कालेजचे दोस्तं दावले . आपली रुम बी दावली . 
' ह्या कोन व्हय रे बापू ?' वस्यानं येका पोरा - पोरीच्या फटूले बोटायनं झुम करत इचारलं .
' ह्या आमचा गुरुप व्हय .' परभ्यानं सांगतलं .
' तुही त दोस्ती झालीच असन !' सद्यानं वस्याले बाजू करत इचारलं .
' सारे दोस्तच राह्यते , त्याच्यात का नवल हाये .' परभ्यानं मनलं .
' नायी , थे खरं हाये पन् कायी खास दोस्त बी राह्यते न !' सद्यानं हासतच मनलं .
सद्या न वस्या जोरानं हासाले लागले. 
' समजलं तुमचं.... माही मज्या घिऊन रायले तुमी .' परभ्यानं यी त्यायच्या संगं हासत मनलं .
मायनं परभ्याले आवाज देल्ला . तीघं यी सपरीत आले . मायनं पोहे आनले अन् पोहे खाऊन झाल्यावर सालदारनीले बलावाले सांगतलं . परभ्यानं वस्याले पाठवलं . 
' का मनते तुवाले दाआजी ?' परभ्यानं सद्याले इचारलं .
' कायी खरं नायी . बेवडेबाजीनं पार खंगला हाये . मायची मजुरी अन् माह्या बकऱ्यायनं चालून रायलं घर . ' सद्यानं सांगतलं .
' आपल्या गावात बेजाच लोकं दारुच्या नांदी लागले हाये . बुऱ्या - भल्याची त समजच हारपून बसले हाये..‌ दारु पेवून का भेटते त देव जाने .' परभ्यानं मनलं .
' कोनी सांगून समजते का बापू ? आपले करमभाग समजून जगाचं बस... दुसरं का ! ' सद्यानं खालच्या मानीनं मनलं . 
तवाच वस्या धावत आला . सालदारीन रान्नीत गेली . सद्या न परभ्या चूप व्हते . वस्यानं दोघायकडं पाह्यलं न थो बी चूपचाप बसला . परभ्याच्या घरात तेलाच्या तरनाचा घमघमाट सुटला व्हता . तीघं बी चूपचाप बसले व्हते ; आपापल्या करमभागाच्या रेघोट्याकडं पाहात !... त्यायच्या भाग्यरेस्या त्यायले कोनीकडं घिऊन जाईन , याचा थांग तीघायले यी नोता .... ( क्रमशः ) 

लेखक : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

Wednesday, April 14, 2021

अजब गजब - ५७ : हिंदू स्याही. bhoyar culture _ भोयर संस्कृति. bhoyari dialect _ भोयरी बोली

अजब गजब - ५७ : हिंदू स्याही
Bhoyar culture _ भोयर संस्कृति
Bhoyari dialect _ भोयरी बोली

महाभारत काल क पह्यलऽ पासिन त ७ व सदी पावतर अफगानिस्तान भारत देस ( हिंदू राज ) को भाग होतो . १७ व सदी पावतर ' अफगानिस्तान ' नाव को देस च नी होतो . पुरानऽ जमाना पासिन वोला आर्याना , आर्या नुम्र वीजू , पख्तिया , खुरासान , पश्तूनख्वाह , रोह येनऽ नाव कन् वरखत होता , जेमऽ गांधार , कम्बोज , कुंभा , वर्नु , सुवास्तु असा इलाखा होता . 
गांधार क राजा सुबल की पोटी गांधारी , व्याकरणाचार्य पाणिनी , गुरू गोरखनाथ यहान का च होय . 
२६ मई १७३९ म दिल्ली को बादस्या अकबर न इराण क नादिरस्या ला इ इलाखो देयो . तब पासिन वको नाव ' अफगानिस्तान ' पड्यो . 
काबुलीस्तान अन् गांधार क इलाखा ला अफगानिस्तान कोस . तीसरऽ सदी पावतर यहान कुषान वंस को राज होतो . येनऽ वंस क पतन क बाद काबुलस्याही राज आये . ( इ.स. ५६५ - ८७९ ) . येला तुरकस्याही बी कोस . तुरकस्याही को राजो लगर्तुमान ला हारायकन काबुल म इ.स. ८७९ म  हिंदू स्याही राज की थापना भयी . लगर्तुमान को बामन मंत्री कल्लार न इ इतिहास रचेतो . यकी जानकारी ' राज तरंगिनी ' म सापडस . 
हिंदू स्याही राज की राजधानी काबुल , कपिसा , उदभंदपुर , हुंद , पुरुषपुर ( पेशावर ) म होती . 
हिंदू स्याही क सिक्का प बयील , हत्ती , घोडसवार , भगवान सिव जी को ठप्पो रवत होतो . 
हिंदू स्याही म ग्यान सिकस्यन का तकसिला , कटासराज अन् शारदापीठ इ तीन जगपरसिध्द ठिकान होता . ' शारदा लिपी ' नाव की बेगरी लिपी होती . पुरऽ राज म मोठमोठा देऊरना बी होता . नमक कोह म साकेसर परबत सबसिन उच्ची स . वहान को अंब मंदिर परसिध्द स . दुय नंबर क उच्ची पहाडी प इ.स. पह्यलऽ १०० बरस पासिन गुरू गोरखनाथ को हिंदू मठ स , जेला टिल्ला जोगियां कोस . हिर - रांझा की कथा सबन ला च मालूम स. जब प्यार म रांझा परेस्यान भयो तब मन क स्यांती साठी वू टिल्ला जोगियां क गुरू गोरखनाथ मठ म आयो आन् वहान दिकस्या लेयी . स्वात घाटी म आब बी भगवान बिस्नु देव को देऊर स . पुरऽ हिंदू स्याही राज म देऊर च देऊर होता . 
हिंदू स्याही राज म आमू ( वक्षु ) , काबुल ( कुभा ) , कुर्रम ( कुरम ), रंगा ( रसा ) , गोमल ( गोमती ), हरिरुद ( हर्यू / सर्यू ) अन् सिंधू नदी होती . 
हिंदू स्याही राज म काबुल ( कुभा / कुहका ) , कंधार ( गंधार ) , बल्ख ( बाल्हिक ) , वाखान ( वोक्कान ) , बगराम ( कपिसा ) , पामीर ( मेरू ) , बदख्शां ( कम्बोज ) , पेशावर ( पुरुषपुर ) , स्वात ( सुवास्तु ) चारसद्दा ( पुष्कलावती ) इ इलाखा होता . 
* हिंदू स्याही वंस : 
- खिंगल ( ७ वी सदी )
- सुरेंद्र गिलगित का ( ६ - ७ वी सदी )
- कल्लार काबुल ( इ.स. ८९० - ८९५)
- कमलुक काबुल ( ८९५ - ९२१ )
- भीम _ कमलुक पुत्र ( ९२१ - ९६४)
- जयपाल ( ९६४ - १००१)
- आनंदपाल ( १००१- १०१०)
- तिरीलोचन ( १०१०- १०२१)
- भीमपाल - धरमपाल ( १०२१- १०२६)
७ व सदी पासिन ११ सदी पावतर हिंदू स्याही राज रह्ये...
मुहम्मद गजनवी संग जयपाल की लढाई भयी . येनऽ लढाई म जयपाल जी हाऱ्यो . हारन क बाद वून न अगनीसमाधी लेई . 
मुहम्मद गजनवी संग आनंदपाल की लढाई भयी . येमऽ राजो आनंदपाल जित्यो . 
हिंदू स्याही को आखरी राजो भीमपाल / धरमपाल मुहम्मद गजनवी संग हाऱ्यो आन् वून न अगनीसमाधी लेई . 

लेखक : इंजि . सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

Monday, April 12, 2021

मांडवस साजवनी ( भोयरी कविता ). bhoyar culture _ भोयर संस्कृति. bhoyari dialect _ भोयरी बोली

मांडवस साजवनी ( भोयरी कविता )
Bhoyar culture _ भोयर संस्कृति
Bhoyari dialect _ भोयरी बोली

मांडवस साजवनी
साल बदल्यो पुरानो
रात अवस की सपी
गावो चईत को गानो ।१।

पाच तास मोह्यतूर
वान उगावून दानो
घर सिवार तोरन
मन चांदी आस सोनो ।२।

रुत घात को चक्कर
आज उजरो चांदन्यो
साजी घर पर गुढी
म्हरो च्यारी धाम बन्यो ।३।

नवो साल नवो ताल
पुरो बदल्यो गा बानो
नवी फुट झाड पेड
बन्यो सपना को ठानो ।४।

देखी चईत पालवी 
केतो वोला वान्हवनो 
भाग कपार प लिख्यो 
सत् वोको पान्हवनो ।५।

रचना : इंजि. सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

Sunday, April 11, 2021

अजब गजब - ५६ : ठिकाना पाटिया. bhoyar culture _ भोयर संस्कृति. bhoyari dialect _ भोयरी बोली

अजब गजब - ५६ : ठिकाना पाटिया
Bhoyar culture _ भोयर संस्कृति
Bhoyari dialect _ भोयरी बोली

राजस्थान क मेवाड राज म भोमट इलाखा म १० राजपूत ठिकाना होता . वोम को येक पाटिया क पंवार ( परमार ) को पाटिया ठिकानो होतो . 
मेवाड क महाराणा क दरबार म उन ला आघ की बयठक को मान अन् ठाकुर पदवी होती . ठिकानेदार ला तीसरऽ दरजा का ज्युडिसियल अधिकार होतो . ६ मह्यना की कयीद अन् १०० रुप्या को दंड करन को बी अधिकार होतो . १००० रुप्या पावतर का दिवानी मुकदमा को फयसलो करन को उन ला अधिकार होतो . 
इ.स. १९४३ क सरकारी रपट क अनुसार महाराणा भूपाल सिंह न पाटिया ठिकानेदार ला जेल बनावन को ( दुय कमरा ) , दरबार म आघ की बयठक , दरीखान को बीडो अन् पाय म सोनो पेहरन को अधिकार देयेतो . इ.स. १९४१ ठिकाना पाटिया म १५ गाव होता . येनऽ ठिकाना की सालाना आमदनी ३००० रुप्या होती . 
ठिकाना पाटिया क दकसिन म गुजरात , सूर्व्यामुखी डुंगरपुर , महादेव मुखऽ जवास अन पसचिम म ईडर होतो . 
इतिहास : * मेवाड राज क हाथ खलतऽ वि.स. ९०२ म पंवार बदनसिंह न बदनोर बसाडे . 
* जवान सिंह ला ठिकाना पाटिया को पह्यलो संस्थापक मानस . जवान सिंह क बाद मोठो पोरग्यो पंचायण गादी प बसे . पंचायण क बाद जवान सिंह को नानो भाई जगमाल न  वि.स. १४५१ पासिन राज संभाले . 
* वि.स. १४७४ म जगमाल को मोठो पोरग्यो मालदेव न राज करे . वोन बेरा मालदेव न आपरऽ नानऽ भाई रडमल ला खिलजी क खिलाफ लढाई म मेवाड क राणा कुम्भा क मदद साठी १७०० सवार लेकन पठाया . ( वि.स. १४९९ ) .
* मालदेव क बाद वको पोरग्यो अजब सिंह अन् अजब सिंह क बाद वको पोरग्यो जवान सिंह ( वि.स. १५५५) न राजपाट संभाले . 
* वि.स. १५८१  म जवान सिंह को पोरग्यो जसवंत सिंह गादी पर बसे . वोन बाबर संग बी लढाई करीती . 
* वि.स. १५९४ म जसवंत सिंह को पोरग्यो हरिसिंह न राजपाट संभाले . हरिसिंह न दलेल सिंह ला गोद ( दत्तक ) लेयो . वि.स. १६२४ की अकबर अन् राणा उदय सिंह क लढाई म दलेल सिंह राणा उदय सिंह किथिन लढ्यो . 
* दलेल सिंह क बाद वको पोरग्यो उदय सिंह गादी पर बस्यो . इ.स. १५७६ की  जगपरसिध्द हरदीघाटी की लढाई म उदय सिंह न महाराणा प्रताप सिंह किथिन मुगल क संग लढाई करी . इ.स. १५७७ म कुम्भलगढ ला महाराणा प्रताप अन् स्याहबाज खान की लढाई भयी . येनऽ लढाई म बी उदय सिंह स्याहबाज खान ला आपरऽ तरवार को पानी दिखाडे . 
* उदय सिंह क बाद वको पोरग्यो दयाल सिंह न राजपाट संभाले . वि.स. १६०४ म दयाल सिंह को पोरग्यो लाल सिंह गादी पर बस्यो . वि.स. १७१३ म लाल सिंह को पोरग्यो रूप सिंह अन् वि.स. १७५३ म रूप सिंह को पोरग्यो दवलत सिंह गादी पर बस्यो . 
* वि.स. १७८४ म दवलत सिंह को पोरग्यो किरत सिंह गादी पर बस्यो . वि.स. १८०४ म किरत सिंह को पोरग्यो अभय सिंह न राजपाट संभाले . वि.स. १८३५ म अभय सिंह को नानो भाई रतन सिंह गादी पर बस्यो . 
* वि.स. १८६१ म रतन सिंह को पोरग्यो बखत सिंह अन् वि.स. १९२६ म बखत सिंह को पोरग्यो गुलाब सिंह गादी पर बस्या . वि.स. १९२८ ला गुलाब सिंह को पोरग्यो भवानी सिंह गादी पर बस्यो . गुलाब सिंह क बाद खुमान सिंह अन् बाद म खुमान सिंह को नानो भाई विजय सिंह गादी पर बस्यो. उन ला रावत पदवी भेटीती . 
* वि.स. २०१७ ( इ.स. १९६० , १५ जून ) ला विजय सिंह को पोरग्यो लक्ष्मण सिंह की तखत पोसी भयी . 

लेखक : इंजि . सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर 

Friday, April 9, 2021

अजब गजब - ५५ : कटासराज. bhoyar culture _ भोयर संस्कृति. bhoyari dialect _ भोयरी बोली

अजब गजब - ५५ : कटासराज
Bhoyar culture _ भोयर संस्कृति
Bhoyari dialect _ भोयरी बोली

ॐ नमः शिवाय

पाकिस्तान म इस्लामाबाद परिन ९० कि.मी. प चकवाल जिला म ' पुरातन सिव मंदिर कटासराज ' स . चकवाल परिन ४० कि.मी. दूर येनऽ तीरथ की मोठी महिमा स . सिंधू - झेलम नदी क खोरा म नमक कोह ( Sault range ) म को इ तीरथ स्थान महाभारत कार को स . येनऽ जागा ला ' किला कटास ' बी कोस . यहान क पहाडी को नाव कटस स . 
१. इतिहास अन् मान्यता : * भगवान सिव जी को सति संग बिह्या होतो . बिह्या म सति क पिताजी न भगवान भोलेनाथ को अपमान करे . येनऽ बात प सति न अगनी कुंड म कुदकन् आपरो जीव देयो . सति क वियोग क दुखकन् भगवान भोलेनाथ क डोरा मिन दुय आसू गऱ्या . येक पड्यो राजस्थान म , जे को ' पुष्कर तीरथ ' बने . अन् दुसरो आसू पड्ये कटासराज म . कटासराज कुंड क पानी ला अमरित मानस . कटास स्यबद संस्कृत क ' कटाक्ष ' स्यबद को रूप होय . 
* त्रेतायुग म जब महाभारत कार म पांडवना ला १२ बरस बनवास अन् येक बरस को अग्यातबास भये तब पांडव कटासराज तीरथ म आयाता . सबन ला तिस लागीती . तब येनऽ कुंड की रखवाली येक यक्स्य करत होतो . युधिस्ठिर सोडकन् सबन येकेक गया . पर पानी लेन क पह्यले यक्स्य वून ला कई सवाल का जबाब मांगता . गलत जबाब देया पर वूई बेहोस होत होता . आखरी म युधिस्ठिर गयो . वोन यक्स्य क हर सवाल को जबाब देये , तब सबन ला पेन साठी पानी भेटे . 
* पोथोहर पठार प कटासराज तीरथ संग च कयी देऊरना की साखरी स . कटासराज मंदिर संकुल ६ व सदी म बनेस , असी मान्यता स . 
* हिंदू स्याही क राज म कटासराज तीरथ संग च ग्यान , कला , संगीत को बी मुख्य केंद्र होतो . तक्षशिला , कटासराज अन् शारदापीठ असऽ तीन केंद्र म विद्यापीठ होता . वोनऽ बेरा कटासराज म १०,००० विद्वान होता . दुनिया भर म फयले ' रोमां ' संगीत कटासराज की देन स . 
* ११ व सदी म महमूद गझनी न कटासराज प हमलो करकन् लुटेत्यो . 
* यहान सेंधा लोन क खदान को लोन पह्यले पुरऽ हिंदुस्थान म आवत होतो . 
* कटासराज रेसिम मारग सिन बी जुड्यो होतो , अन् इ बेपार को भी मोठो बजार होतो . 
* इंडो पाक प्रोटोकाल १९७२ क तहत हर साल २०० हिंदू कटासराज तीरथ की यात्रा कर सकस . 
* भगवान भोलेनाथ को इ तीरथ मोठो पावन अन् चमत्कारी स . 
* कारतिक अन् महासिवरातरी ला यहान यात्रा भरस .
* इ.स. १९४७ क बटवारा क बास्त यहान का हिंदू हिंदुस्थान आया . 
# जिंदगी म येक डाव तरी कटासराज तीरथ, भगवान भोलेनाथ को दरस्यन कऱ्या पायजेन ...

लेखक : इंजि. सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

Thursday, April 8, 2021

अजब गजब - ५४ : बिलौट तिलौट

अजब गजब - ५४ : बिलौट तिलौट
Bhoyar culture _ भोयर संस्कृति
Bhoyari dialect _ भोयरी बोली

पाकिस्तान म अफगानिस्तान सरहद ला लागकन् खयबर पख्तुनख्वा प्रांत स . येनऽ प्रांत क डेरा इस्माईल खान जिला म ' काफिरकोट ' नाव दुय किल्ला ( गड ) स . डेरा इस्माईल खान पासिन ५५ कि.मी. दूर बिलोट नाव को नानोसो गाव स . या जागा हिंदूकुस परबत क पायथाजवर सिंधू नदी क काठ प स . यासिन च सेंधा लोन खदान की पहाडी चालू होस . यहान बालीकोट नाव को खूब मोठो किल्लो ( गढ ) स , जेला आब काफिरकोट कव्हस . यासिन दकसिन दिस्या म ३५ कि.मी. प दुसरो गढ़ स जेला बी काफिरकोट च कव्हस . येनऽ दुय जागा पर को बांधकाम , देऊरना सरखा च स . बालीकोट म ८ मोठऽ देऊर की साखरी स . इन ला उत्तर सिंधू मंदिर कोस . इ किल्लो ( गढ ) अन् देऊरना २००० बरस पुराना स , असी मान्यता स . इसापूर्व १० पासिन ७ व सदी पावतर इन को बांधकाम भये , असो मानस . येम को १ देऊर इ.स. १९९२ म खसे . 
यहान का देऊरना नदी क नावकन् स : 
१. सिंधू  २. वितस्ता ( झेलम ). ३. इरावती ( रावी ). ४. शतद्रु ( सतलज )   ५. सरस्वती ( घग्गर ) ..
यहान क किल्ला क दिवाल साठी अन् देऊर साठी जी पत्थर ( दगुड ) बापरेस वू यान को नहाय . उसा दगुडना च यहान नहाय . इ दगुडना खुशालगड परिन नदी क रस्ता कन् लायेस . बांधकाम करन साठी येनऽ फाडिना ला मोयरज क घर वानी साहाकोनी घडायास . देऊर क बांधकाम पर जास्त असर गंधार कला को अन् कस्मिर कला को दिसस . ( गंधार कला म देऊर को गुम्बद गोल रव्हस त् कस्मिर कला म गुम्बद पिरामिड सरखो रव्हस .) 
जवर च मियांवाली तहसील म मनिकोट नाव को गढ स . नाव परिन च अंदाजो आवस क इ किल्लो मनजे हिरा मोती को गढ ! 
यहान नदी मिन पानी उपसन का पुराना साधन दिसस . खुदाई म चांदी का सिक्का बी सापड्यास . चाराना पयसा क आकार वालऽ येनऽ सिक्का पर येक आंगऽ घोडा को अन् दुसरऽ आंगऽ बयील को चितरंग स . 
इतिहास:  * पुरानऽ जमाना म अफगानिस्तान पासिन कस्मिर पावतर गंधार राज होतो . येनऽ राज क मझांर मिन सिंधू नदी बाहत होती .  येनऽ राज ला ' हिंदूस्याही ' असो नाव होतो . महाभारत काल पासिन ११ व सदी पावतर यहान हिंदू राज होतो . 
* काबूल स्याही मिन हिंदू स्याही निकरी जी हिंदू होती अन् येक स्याही बुध्दमत वाली निकरी जिन को राज गिलगिट , बाल्टिस्थान पर होतो . 
* काबूल स्याही कुस्यान नी त् कम्बोज वंस मिन निकरी होयेन , असो बी अंदाजो कोनी अभ्यासक लगावस . 
* यहान का आखरी हिंदू राज्या , राजा तिल अन् राजा बिल होता . उन क च नाव कन् येनऽ दुय गढ ला ' बिलौट न तिलौट ' इ नाव पड्यो . 
* महमूद गझनी न भारत म कयी बेरा लुटपाट करी . वको आवन को रस्तो बिलौट तिलौट परिन च होतो . वू अत्याचार करन साठी अन् देऊर तोडन साठी बदनाम होतो . पर बिलौट तिलौट ( काफिरकोट ) क सिंधू देऊरना ला वोनऽ काहे नी तोड्यो , या त् राज की च अन् अचंभा वाली च बात स . 

लेखक : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

Tuesday, April 6, 2021

भोयरी संस्कृती - ४१ : खानपान. bhoyar culture _ भोयर संस्कृति. bhoyari dialect _ भोयरी बोली

भोयरी संस्कृती - ४१ : खानपान
Bhoyar culture _ भोयर संस्कृति
Bhoyari dialect _ भोयरी बोली

भोयरी संस्कृती म खानपान पर भौगोलिक रह्यन सह्यन , उनारो - हिवारो - बरसाद इ रितू की घात , फसलपानी  , स्थलांतर , पूंजा पाठ , नेम नियम को घाडो च असर स . मानुस जहान जास वहान क माती - पानी क गुन रंग म मिसर जास . पर येतरो बदलाव होन क बाद बी कई मुर खानपान आन् सवाद टिककन् रव्हस , आन् याच कोनत् बी संस्कृती की वरख बनस . 
* पुरानऽ जमाना म कोनी पाव्हनो घर आवतो त् पह्यले वको स्वागत पानी संग गुर को खडो देकन करत होता . आबऽ पानी संग चाहा रव्हस . 
* भोयर को परसिध्द नास्तो मनजे भुंज्या पापड ( ताक का पापड नी त् धापोडा ) आन् भुईमूंग का भुंज्या दाना . ताक का पापड त् भोयर की पह्यच्यान स . 
* दिवारी क मह्यना म लाडू , सेव , चिवडो , अनारसा , सक्करपारा , चकली क फरार की धूम रव्हस . दिवारी क दुयच्यार दिन सकारी सकारी च दूध सेवरी ( सी ) नी त् दही सेवरी ( सी ) को नास्तो पक्कोच रव्हस . 
* देवपूंजा ( सेंदरे देव अन् मानिनी की पूंजा ) क दिन तरन साठी कढय चुल्हा पर रव्हस च ! सुवारी , बडा , वरन भात , कढी , तऱ्या पापड , गोड ( बासुंदी , सिरो , सिरीखंड ) आन् कढाई म बनाई बडी की सुखी भाजी असो पाची पकवान सयपाक करस . देवपूंजा सोडकन् बाकी तिवार ला बी असोच रांधनो रव्हस . 
अखाडी , जिवती , नागपंचमी , बहुड्डो , पोरो , आठवी , गायगोंधन , लक्षुमी पूंजा , तुरसी को बिह्या , नागदिवा , देवमाई , पाचपावली , मांडोस , साजवनी , पितरपख , अखरपख , अखजी , मांडो उजवन क दिन असा पकवान बनस . 
* पुरन , आमटी , भज्या , भात , तऱ्या पापड , भाजी , गोड असा पकवान पोह्यती , खांदसेकनी , दसरो , सिमगो , मांडोस येनऽ तिवार ला हमखास बनस . 
( घर घर क रिवाज म थोडोबूत फरक पडत होयेन .) 
# नेम , खासियत अन् रिवाज : * जल्मास्टमी ला गोड पुरी करस . ( हलवा की पुरी , सांजा की पुरी .) 
* खांदसेकनी - येनऽ दिन कुम्बडो , काकडी , दोडक्यो , मूंग बरबटी की सेंग यमीन कोनती बी येक भाजी करस . 
* पोरो - पोरा ला जब बयीलजोडी तोरन म जास तब ठोम्बरा  को मान रव्हस . कुटी जवारी , दूध , इलायची , गुर / साखर कन् ठोम्बरो बनावस . रात म सुवारी बडा , वरन भात , भाजी , लाडू , अनारसा करस . 
* रिसी पंचमी ला कुम्बडो , मको , पोथी / धोपा का पान , बाल की सेंग , बटाना , भेंडी येम की कोनती येक भाजी करस . येनऽ भाजी ला तूप की बघारनी देस . भाजी संग देवचऊर को भात नी त् मक्या का कन्या करस . चाहा साठी गाय को दूध नी चलत पर मयीस को चलस .
* पडन - दसरा क पह्यलऽ दिन ला पडन कोस . येनऽ दिन कोनतीच सातरनी नी चलत . बस वरन भात , रोटी पर काम चलावनो लागस . 
* माडी - माडी ला बोफोडी ( मूंग की ) , कढी आन् अटाये दूध रव्हस . 
* आठवी - आठवी ला आंबिल , कनिक का गोड अंगार भंगार ( चटुरा बटुरा ) को मान रव्हस . पूंजा साठी जी चंदर सूर्व्य बनावस ती सिरफ मानुस अन् पोटुना ला च खावता आवस . बाई , पोटीना ला इ खानो वरजिक स . 
* नागपंचमी , नागदिवा अन् पाचपावली क तिवार ला कढय ( रवा को सिरो ) करनु च लागस . 
* नागपंचमी ला लाही फुटाना आन् सातू को मान रव्हस . कई कुटुंब म फुलोरा की सुवारी बडा ला नातगोत क घर पठावन को रिवाज स . 
* पोरा की कर ( तान्हो पोरो ) अन धुड्डी ला खानीवाला मासमच्छी खास . मासमच्छी खानीवाला आरबाडी ( सरप बिचू का मंतर जाननी वाला , बारी गावनी वाला ) होयेन त् उन ला पोरा क कर ला मासमच्छी नी खाता आवत . उई रुसीपंचमी क बास्त खाय सकस .
* संगरात क पह्यलऽ दिन ' लाडू पेंडी ' करस . तिरगुर का लाडू अन् पेंडी ( येक कंद ) को निवद चवरी जवर धरस उसोच  देऊर अन् खेत म बी पठावस . लाडू पेंडी क दिन हुड्डा ( जवारी का ) की गोड घुगरी , बाल क सेंग की भाजी करस . 
* पुस्या इतवार ला उपास धरस . पर इ उपास दिन बुडन क पह्यले च सोडनो पडस . कोनी कोनी खेत म च रांधकन् उपास सोडस  , वोला वनभोजन कव्हस .  उपास सोड्या बास्त सकारी वरी चाहा , पानी बी वरजिक रव्हस . 
* रथसप्तमी ला आंगना म तुरसी जवर खीर को निवद महादेव मुख नी त् सूर्व्या मुख ऊतू जान देस . 
* साजवनी - साजवनी क दिन , मेढ ला बांधी संजी की उंबीना क गहू ला दरकन् , वोनऽ नवऽ गहू की गुर / साखर डायकन् गोड रोटी बनावस आन् वको निवद बयीलना ला देस . साजवनी क दिन पूंजा भया बाद मालक , गडीमानुसना , पोटुबाटु खेत म च जेवस . आमरस , कुरोडी , सी ( सेवरी ) , दोयपुडी रोटी , भाजी असा पकवान रव्हस . पूंजा अन् जेवन भया बाद सबन घर म आवस . आबऽ घर म ' दारपान ' को कार्यक्रम रव्हस . सातऱ्या सोला , बतासा सबन ला देस . रात म तिवार करस .
* अखरपख - सुवारी काहाडन क सलाक म सुवारी बडा वोयकन् वोला , पितर जेनऽ दिवालसिन काढ्यास , वोनऽ दिवाल म खोसस . वोकऽ खलतऽ निवा पर सुवारी बडा परीन तूप की धार सोडस , जी निवा पर पड्या पाह्यजेन . येनऽ पूंजा ला ' पितर की सिदोरी ' कव्हस . 
* अखजी ला सुवारी बडा , सी ( सेवरी ) , कुरोडी , आमरस , लाडू , करंजी , गोड पापडी , टिखट पापडी करस . 
* बिह्या साठी पोटी , पोटू देखन क बेरा आबऽ आलू पोहो आन् चाहा पक्को रव्हस .
* दुय तीन पीढी पह्यलऽ पावतर बिह्या म सुवारी बडा नी त् पुरन को जेवन बी कयी झना देत होता . 
* पुरानऽ जमाना म नानपन च बिह्या होत होतो . तब खास सनतिवार ला बू ला ल्यावत होता . पोरा क बास्त १० दिन का धागा भया पर ल्यावन ला जात होता . २१ करंजी ( गुजिया ) , गुना की सिदोरी बेरु क हारा म धुर पर बांधकन् लिजात होता . धुरकरी बू क घर अरधो खोबरा को डोल देत होता . जब बू धुरकरी संग आपलऽ ससुराल म आवत होती तब वकी माय बी २० करंजी , गुना की सिदोरी देत होती . या सिदोरी मंग येटार म पाच घर बाटत होता . 
जब स्यांतीक होत होतो तब धागा का रोठ बनावत होता . 
* ढोंढ्या को मह्यनो सप्या बाद दार क सांजा नी त् सिरा का ' ढोंडफल ' ( मोदक सरखा ) बनावस .
* कुम्बडा का कोरोडा - पिके कुम्बडा ला किसकन् वोमऽ उडिद की दार भिजायकन् मिसरावस . येनऽ मिसरा का कोरोडा बनायकन् सुखावस . कुम्बडा क कोरोडा की बडी क भाजी सरखी भाजी बनस . 
* उनारा म बयंगन , भेदरा , बाल की सेंगना की ' उसरी / खुली ' बनावस . बरसाद म भाजी साठी इ काम म आवस . 
* उनारा म आम्बा पिक्या पर ' आम्बा का पाव्हना ' को रिवाज भोयरी संस्कृति म स . गनगोत , सगा सोयरा ला आम्बा को रस , सी ( सेवरी ) , कुरोडी , पापड , मांडा रोटी / सुवारी असा पकवान को पाहुनचार करस . 
* चयीत मह्यना पासिन बयसाख मह्यना पावतर गाव / परगाव क देऊर / स्थान पर रोठ , वरन भात , भाजी को सयपाक करस . सबन कुटुम्ब कबिलो , संगी साथी येमऽ संग रव्हस . 
* नागपंचमी , जल्मास्टमी , गनपती , महालक्षुमी , नवरातरी ला फुलोरो करन को रिवाज स . कोनी कोनी आठवी ला नवस को फुलोरो धरस . 
* जवारी का आयता - सिमगा पासिन दुय मह्यना ( आम्बा खावन की घात आवत पावतर ) जवारी का आयता खूब चलस . गोड आमसुल सवाद का आयता कुम्बडा / दूध को गोड / आमरस संग मोठा सुरुस लागस . 
* पानगा पारटी - हिवारा म कठान क घातऽ खेत म ' पानगा पारटी ' की धूम रव्हस . पानगा पारटी साठी सबन कुटुम्ब कबिलो खेत म जास . गवरी क जगरा प पानगा सेकस . वोनऽ जगरा म च खेत म क बाडी का बयंगन भडीत साठी भुंजन ला डावस , आन् दार बी वोपर च सिजवस . पानगा क पीठ म खेत म का च भेदरा , मिरची  , कांदा / लसून को पालो मिसरावस . सीवन क ( नी त् वोक सरख च दुसरऽ झाड काइ पत्ता ) पत्ता ला तेल लगायकन् वोपर पानगो थापस . वोपर उलटो पत्तो धरकन् वोला जगरा म डावस . पोटुबाटुना की खेत भर धिंगामस्ती चालू रव्हस . गरम गरम पानगा , दार , भडीत , हिवरऽ मिरची को ठेसो , कुसलो अन् भीर को गोड पानी असो साजरो लागस क साल भर वकी याद आवस . 
* मोह फुल - मोह फुल क घातऽ वून ला जमा करकन् सुखावस . येनऽ संगराये मोह फुल का बरसाद म , झड म नाना तरीका का पकवान बनावस . 
१. पुरन - मोहा फुल ला चांगला लाल आवत वरी सिजवस . वोमऽ सोला की दार अन् गुर बी डावस . येनऽ मिसरा की पुरन बनावस . या पुरन खान क तेल संग खास . 
२. डोंबरी - मोहा फुल ला भुंजकन् , धोयकन् सिजवस . येमऽ सोला की दार मिसरवस .
३. बोफोडी - मोहा फुल भुंजकन् सिजवस न वोला बारीक बाटस . वोमऽ थोडी सी कनिक बी डावस . मंग वकी बोफोडीना भाप पर उकडस . इन ला तेल संग खास .
४. पानोरी - मोहा फुल ला तेल डायकन् भुंजस . संगच सोला बी भुंजस . 
* उनारा म उसरी , ताक का पापड , धापोडा , कुरोडी , सी ( सेवरी ) , मूंग बडी , खारवडी , साबुदाना का पापड , सरगुंडा , आलू चिप करकन् धरस .
* चून , आम्बाडी की भाजी , पानबडा , चुनबडी , पाटोडी , कढी म का पानबडा , बडी की भाजी अन् असी कयी भाजी की लंबी लाईन स . 
* जेनऽ कुर म ' वाघोबा ' होयेन वूई पोरग्यो भया पर बकरा अन् पोटी भया पर खुकडा की बली देस . 

( सहयोग : सौ. पार्वतीबाई महादेवराव देशमुख ) 
लेखक : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

Thursday, April 1, 2021

दिशा दाही अंधारल्या ( कविता ). marathi language _ मराठी भाषा

दिशा दाही अंधारल्या
( कविता )
Marathi language _ मराठी भाषा

दिशा दाही अंधारल्या
तोंडा दिसेना तो घास
तळहाताच्या जाळ्यात
धनरेषे गळा फास ।१।

दिशा दाही अंधारल्या
वेगे साकळला त्रास
विण उसवली नाती
धागे बदनाम खास ।२।

दिशा दाही अंधारल्या
कृष्ण विवराचा भास
खेचे तिळ तिळ सारा
 उष्ण जगण्याचा जोश ।३।

दिशा दाही अंधारल्या
एका किरणाची आस
सारा शोषतो काळोख
कुडी बेभानला श्वास ।४।

दिशा दाही अंधारल्या
वांझ स्वप्नी मधुमास
गंधाळली शवयात्रा
घेतो मरूनी सुवास ।५।

दिशा दाही अंधारल्या
सरे जन्माची मिजास
दगदग थंडावली
आता सरणी विलास ।६।

रचना : इंजि . सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

सरवा- भाग २३. varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

सरवा - भाग २३
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

परभ्याचा निकाल आला . परभ्या नाप्पूरले मंदारच्या घरी आला . मंदारले aerospace engineering कराचं व्हतं , पन् परभ्याचा कायी इचार पक्का नोता . दोघाय न बी फारम भरले . मंग याडमिसनचे राऊंड चालू झाले . मंदारचा बंगलोरच्या कालेजमंदी नंबर लागला . बंगलोरले मंदारची बहिन बी राहात व्हती . मंदारच्या बाबाचं लय टेंसन दूर झालं . परभ्याचा काम्पुटर सायन्स यांड इंजिनियरिंग साठी अवरंगाबादले नंबर लागला . 
अवकाली पान्यानं संतऱ्याचं भायीच नुकसान झालतं . हातातोंडी आलला घास पान्याच्यानं गेला . परभ्याच्या दाआजीचा भरोसा संतऱ्यावरच व्हता . उनारी भुईमूंग त डुकरायनं पार उखरुन टाकली व्हती , रोह्यायचा तरास त येगराच . याडमिसन तवरुतच कराची व्हती . परभ्याच्या दाआजीचे क्राप लोनचे पैसे ब्यांकत जमा व्हते . आता थे परभ्या नावाच्या नव्या पीकासाठी लागनार व्हते . परभ्याच्या दाआजीनं थे पैसे काहाडले . 
परभ्या तसा कायी लय हिंडला नोता . वरधा , नाप्पूर , उमरावती , मोझरी , माहूर , सेगाव , सालबड्डी , पारडसिंगा पावतरच त्याची धाव व्हती . त्याच्या हिसोबानं अवरंगाबाद लय दूर व्हतं . 
परभ्यानं रेलवेच्या टिकिटा काहाडल्या , नंदीग्राम येक्सप्रेसच्या . तारखीवर परभ्या आन् दाआजी नाप्पूरले आले . मंदारच्या घरी फटफटी ठिवली . मंदारच्या बाबानं दोघायले रेलवे ठेसनावर सोडलं . गाडी अवरंगाबादले आली तवा रात झालती . थे हटेलात थांबले . सकारीच च्या - नास्ता करून आटोनं कालेजात गेले . लय मोठ्ठं कालेज व्हतं . परभ्याले त सारं नवाडं नवाडं वाटून रायलं व्हतं . पुरा दिवस कालेजात गेला . याडमिसन झालती . 
' आता च्यार वर्स तुले हिथंच सिकाचं हाये बापू .' दाआजीनं मनलं.
' हव...' परभ्यानं मनलं.
दोघं बी रेलवे ठेसनावर आले . परभ्या भुकीजून गेलता . ठेसनातल्या हटेलात दोघं बी जेवले आन् गाडीची वाट पाहाले लागले . परभ्याले झोपंची गुंगी आली . दाआजीच्या मांडीवर डोकसं ठिऊन थो निजला . दाआजीनं त्याले थोपटत त्याच्याकडं पाह्यलं . लहानस्या पोरासारखा परभ्या बिनघोर निजला व्हता . पापनीआडून त्याच्या डोऱ्याचे बुबुरं फिरत हाये , असा भास दाआजीले झाला . 
' पोरगं सपान पाह्यत असन बटं ! ' दाआजीनं मनातच मनलं .
त्यायनं यी परभ्यासाठी लय सपान पाह्यले व्हते . कास्तकाराच्या जिनगानीत लय हाल हाये . आपल्या पोरानं लय सिकावं , नाव कमावावं , असी त्यायची इच्छा व्हती . परभ्या तसा यी लेहन्या - वाचन्यात खूब हुस्यार व्हता . त्याले सिकस्यनाची भारीच आवड व्हती . पुऱ्या तह्यसिलीत त्याचं नाव व्हतं . त्याची हुस्यारी वाया नायी गेली पायजेन , असं त्यायले वाटे . लाडा - कवतिकाचा , येकुलता येक जीवाचा तुकडा आता मोठा झालता . त्याच्या पखाचं अगास येगरं व्हतं ..... त्याची दुनियाच नवखी व्हती . आतापावतर कोचोड्यात राह्यलेल्या पाखरासाठी आता सारी दुनिया खुली व्हती .... त्याची झेप आपल्यापासून दूरवर जाईन... थो आपल्यापासून दूर व्हयीन . ... ह्या विचारानं त्यायचा हिरदा भरून आला . आपरंगच डोरे झराले लागले . त्यायचा आसू नेमका परभ्याच्या गालावर पडला . दाआजीनं दुपट्यानं थो पुसला आन् परभ्याची झोप उघडली . 
' किती येर हाये जी ?' उठून बसत , डोरे पुसत परभ्यानं इचारलं .
' येईनच बापू आता . ' दाआजीनं मोबाइलवर गाडीचं स्टेटस् पाहात मनलं . 
' तुमाले बी झोप येत हाये का ?' जांभोरी देनाऱ्या दाआजीकडं पाहात परभ्यानं इचारलं .
' नायी , तू बसतं का उलिसा , मी हातपाय मोकरे करून येतो .' परभ्याच्या दाआजीनं कंबर मोडत मनलं .
' ठीक हाये... या तुमी , मी बसतो हिथंच .' परभ्यानं दाआजीजवरचा मोबाइल घेत मनलं .
दाआजी प्ल्याटफारमवर फिराले लागले . परभ्या त्यायच्यावर लक्स्यं ठिवून व्हता . दाढी पिकली व्हती दाआजीची ! उनानं त्यायचा चेहरा बी कारपटला व्हता .. लय चिंता करते त्याचे ढगं त नोते थे ! रातदिस निरी दगदग ... घडीभर यी आराम नायी . दिसाले पैलवान पन मनानं लय सकवार . त्यायनं कंदी बी परभ्यावर हात उचलला नोता , पर त्याले भेव त लागेच ! परभ्या आपल्याच गुंताड्यात व्हता . उलिसी नजर हटली त् त्याले दाआजी कायी दिसले नायी . थो भेबारुन गेला . 
' कुठं गेले असन ?' परभ्यानं सोतालेच इचारलं .
भेव अन् चिंतेची इज त्याच्या छात्यात चमकली . आता पावतर त हिथंच फिरत व्हते ... गाडी येईपावतर नायी आले त कसं कराचं ??... त्याले जाग्यावरून यी उठता येत नोतं . आपन इकडं तिकडं गेलो न दाआजी इकडं आले त मी दिसनार नायी . चारी आंगं मान फिरवू फिरवू परभ्या जवरपासून दूरपावतर पाहाले लागला . भेवाच्या लाटावर लाटा त्याच्या डोकस्यात न मनात फुटत व्हत्या . भेवानं त्याले घाम फुटाले लागला अन् पापनीवर आसवाचे पाखरं बसाले लागले . पोटातून येक गोला त्याच्या छातीपावतर आला न त्याले हुंदका फुटला . आतापावतर त्याच्या पापनीवर बसलेले पाखरं भूर्रकन उडाले न आसवाची गंगा जमुना वाहाले लागली . सारा प्ल्याटफारम त्याले अंधुक अंधुक दिसाले लागला . चालनारे बायामानसं , बोलनारे पोरं पोरी , चिल्लावनारे हमाल , बोंबलनारे च्या वाले हे सारे त्याले वाटरकलरच्या चितरंगासारखे  , पान्यात वाह्यत्या रंगासारखे दिसाले लागले . येक मोठी सावली त्याच्यापुढं आली . 
' कायले लडून रायला रे बापू ? ' थ्या सावलीकडून आवाज आला .
येक पांढरा कपडा त्याच्या डोऱ्यावरून फिरला न नाकपुड्या त्याच्या चिमटीत गेल्या . दाआजी पुढं उभे व्हते . थो पटकन उठला तसं दाआजीनं त्याले छातीसीन पकडलं . 
' का झालं ? ' दाआजीनं त्याच्या डोकस्यावरून हात फिरवत इचारलं .
' तुमी कुठं गेलते ?' परभ्यानं दुपट्यानं आसू पुसत इचारलं .
' अरे हिथंच व्हतो . जरासा लघवी कराले गेलतो . मी दिसलो नायी मून तू भेबारला का ? ' परभ्याले बसवत दाआजीनं मनलं .
' नायी त का ... तुमी सांगतलं बी नायी . ...' परभ्यानं नाराजीनं मनलं .
' चुकलं माह्यं... बरं.. पन् येक लकस्यात ठिव , मी कुठं बी असलो तरी माह्यं पुरं ध्यान तुह्याकडच राह्यते . तुह्यातच जीव हाये रे बापू आमचा ! आपलं इन मीन तीन झनाचं घर पर जीव त् येकच हाये नं . आयुकस्यात भेवाचं नायी कंदी बी .... मी दिसलो नायी तरी तुह्या सावलीत मीच हावो.... तुह्या चारीआंग मीच हावो , हा भरोसा ठिवाचा . मायबापाचा जीव कंदी बी पोरायपासून दूर ऱ्हात नायी बटा . घे , पानी पे .' ब्यागंतून पान्याची बाटल काढून परभ्याले देत दाआजीनं मनलं .
' आपन दोघं इकडं हावो , तिकडं घरी तुह्यी माय जेवली नसन . तू नाप्पूरले व्हता तवा तिले तुही आठवन आली क तिचा घास घेतला हात थिजून जाये... थांबून जाये . बस तिथंच जेवन आटपे तिचं ! तिले लय समजावो ... पन् थे तुह्यी माय व्हय ... आयकन् थोडीच . खान्यापेन्याकडं ध्यान द्यावं मानसानं . जोवर कुडी तवर देवाजीची गुडगुडी... मंग जगबुडी ! ' दाआजीनं परभ्याले समजावत मनलं .
परभ्या अन् दाआजी घरी आले . माय वाटच पाहात व्हती . 
' आंगपाय धुवा पटकन ... मी गरम गरम जेवनच वाढतो . ' मायनं इजच्या फुरताईनं कामं आवरत मनलं . 
रान्नीत मायनं पाटं लावले.. ताटं वाढले . वरनभात , भाजी , पोई सारं गरमागरम ! वरून मायच्या हाताले चवच मोठी साजरी . 
' माय , तू रातरी जेवली व्हती का ?' परभ्यानं पाटावर बसत इचारलं .
दाआजी जेवाले लागले. 
' असा काऊन इचारतं बापू ?' मायनं पोई सेकता सेकता मनलं .
' पह्यले सांग त् .' परभ्यानं मनलं .
' तुमी जेवा पह्यले गरम गरम .' मायनं दाआजीले पोई वाढत मनलं .
' सांग न पह्यले .' परभ्यानं हठ करत मनलं . 
' तुमी जेवले क पोट भरते माह्यं . .... जेवनं बापू .' मायनं दाआजीले वरन , भाजी वाढत मनलं .
परभ्यानं उठून आपला पाट आन् ताट मायजवर मांडला . पोईभाजीचा घास परभ्यानं माय पुढं धरला . 
' तू घे पह्यले.' परभ्यानं मनलं .
' सयपाक करता करता जेवते का कोनी बापू ? ' मायनं पोई वाढत मनलं .
' थे मले माहीत नायी .. तू घे पह्यले .' परभ्यानं मनलं .
दाआजी गपचूप भरंभरं जेवले . 
' बरं तुमचं मायलेकाचं चालू द्या... मी येतो वावरातून .' दाआजीनं हासतच हात धुवत मनलं .
' तुमी पोटभर नायी जेवले का जी ? ' मायनं इचारलं .
' मी जेवलो पोटभरून ... तुमी दोघं बी जिऊन घ्या बरं आता .' दाआजीनं सपरीत जात मनलं .
दाआजीच्या फटफटीचा आवाज आवारात घुमला . मायनं तावा उचलून ठिवला न हात धुतले . मायनं पाट घेतला न परभ्याजवर बसली . 
' असं नायी कराव लेकरा .... चाल जेव आता .' मायनं परभ्याले घास भरवत मनलं .
परभ्यानं यी मायले घास भरवला ... मायलेक संगच जेवले . 
' झाली का रे बापू याडमिसन ? ' मायनं इचारलं . 
' हव झाली न . ' परभ्यानं सांगतलं .
' किती वर्स लागन रे बापू ? ' मायनं इचारलं .
' च्यार वर्साचं हाये . मंग पुढं सिकीन थे येगरं .' परभ्यानं सांगतलं .
मायनं त्याचा चेहरा सेवानं पुसला न त्याच्या कपाराचा मुका घेतला .
' अयऽ.... बापू हाय का ?' सद्याचा आवाज आला .
सद्या अन् वस्याची जोडी हाजर झालती....  ( क्रमशः ) 

लेखक : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर