शापित यक्ष
Marathi language _ मराठी भाषा
माझ्या स्वप्नातील इंद्रधनु तू पापणीवर झेलतेस _
अनाहुत सर ही बरसून जाते तुझ्या पापणीखाली
मग कळतं आपल्या गुलाब ताटव्याची कापणी झाली .
माझ्या डोळ्यातील उष्ण आसवे तू हृदयाने शोषतेस _
साथ जन्मोजन्मीची तरीही विरह अग्नी वाट्याला आली
हात रक्ताळल्यावर कळतं की धार ही काट्याला आली .
माझ्या हृदयाची स्पंदने रोज स्व भाळावर कोरतेस _
रंगवून जांभळी पहाट चित्रात का अशी सांज ओली
चरणी निर्माल्य झाल्यावर कळतं वेदना वांझ झाली .
माझीच चैत्रपालवी तू रोमारोमांवर मिरवतेस _
परंतु मी अनिकेत तरीही कुशीत जगवून गेली
मग शापित यक्षाला कळतं ही प्रीत तगवून गेली .
रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment