Saturday, July 9, 2022

घेन्नं रे बापू. varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

घेन्नं रे बापू
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

घेन्नं रे बापू
पेन्नं रे देसी
तावली मज्जा
घरी येकादसी ।१।

घेन्नं रे बापू
तन्नाव खाटी
माय लेकरं
उपासी पोटी ।२।

घेन्नं रे बापू
तू फटफटी
डवंडराची
हाउस मोठी ।३।

घेन्नं रे बापू
पे सिगारेटी
खंगरून जा
 मसनवटी ।४।

घेन्नं रे बापू
खाय नं बोटी
पाटीलकी तू
दाखव खोटी ।५।

घेन्नं रे बापू
कर नं चाटी
मोडून टाक
कुपाची काटी ।६।

घेन्नं रे बापू
उप्पड खुटी
हाती राह्यली
फक्त नरोटी ।७।

घेन्नं रे बापू
कटुरा वाटी
भीक मांगाले
सोड लंगोटी ।८।

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

No comments:

Post a Comment