Saturday, June 25, 2022

येलाले बेलं. ( वऱ्हाडी कविता ). varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

येलाले बेलं
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

तंग निरुंद नजरा
अंदरुन सारं पोलं
उभ्या उभी धडकते
वल्ला सादर गा झोल ।१।

लोकायले गुरूग्यान
सोता पांघरते झुल
तोऱ्यात बयलावानी
पडे तोरनीची भूल ।२।

फिक्या पोऱ्याच्या झडत्या
जीभ झाली चवचाल
नस्या राजकारनाची
टाके बिघडून चाल ।३।

इके सस्ताईत खरं
आलं खोट्यालेच मोल
सीध्या सरख्या रस्त्यानं
जाते बावा कसा तोल ।४।

वरवरचा दांगडो
उगा बडवते ढोल
लावे येलालेच बेल
आन् परसाले फुल ।५।

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

No comments:

Post a Comment