रीठ
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली
दुख दवडीचं भारी
जात्या आटलं गा पीठ
असी लागली नजर
कसी काढाव बा दीठ ।१।
सारा अंधार भोगाले
अगास यी काराकिट
झालं नांदत्या गावाचं
देवा सुनसान रीठ ।२।
झाली जिंदगीची वारी
रोज रोज पायपीट
आता हालव इट्ठला
पायाखालची गा इट ।३।
जीव आदमुस्या झाला
येते रात दिस झीट
माही अलोनी जिंदगी
सरे आसवाचं मीठ ।४।
आस सास उखडले
आता आखरीची वाट
रामनामाचा गजर
धाम समस्यान घाट ।५।
रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment