खादोल
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली
पाडावर आला आंबा
त्याच्यावानी गोड नायी
खादोलीच्या चवीले त
अमरीत तोड नायी ।१।
मायचा पालव सर्ग
त्याले कोनी जोड नायी
सुद्यासाठी टेनपनं
कायी मारझोड नायी ।२।
मायबापाच्या रस्त्याले
कुठून बी मोड नायी
जरे धडधड सप्पा
जगी असा खोड नायी ।३।
जिंदगीभर दे छाया
बापावानी झाड नायी
कुठं बी घरासरखं
मायेचं रफाड नायी ।४।
आसीरवादाचा हात
मतलब आड नायी
बरसते चारी कार
उलीसी उघाड नायी ।५।
रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment