फाटला अगास
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली
असा करमाचा खेल
सारा फाटला अगास
उसवले नाते गोते
लागे जिंदगीचा फास ।१।
ताल तितंबा पोट्याचा
बेजा त्यायचा तरास
घर फेराचा कायनं
झाला कवलाचा नास ।२।
घात पेरनीची आली
नाकी मातीचा सुवास
बीजाईचं डंडेगान
खुंदे उधारीचा तास ।३।
पीक गांजलं तनानं
उपवली सारी आस
फेर निंदन - डवरा
तरी माजला रे कास ।४।
झड आसवाची ओली
झाला मालकाचा दास
सरनाले ढोसासाठी
हाये तिरडीचा बास ।५।
रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment