वाटस्याप
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली
वाटस्यापचे गुरुप
पोस्टं धाडाची गा बानी
सांज सकारी हुरुप
सारे भलतेच ग्यानी ।१।
राजकारनाचा कट्टा
चाले दांगडो तुफानी
बसे रट्ट्यावर रट्टा
झगड्याची राजधानी ।२।
घेनं - देनं कायी नायी
अडान्याचं नस्यापानी
बिनकामी कोल्हेकुई
हयदोस मनी रानी ।३।
आलं इमोजीचं राज
स्यबदच मुक्यावानी
फारवरडेड माज
फुकटचं दानापानी ।४।
किती आवरा आवरा
अगा आगुटना कोनी
करे पराचा कावरा
खरं जाये उपवोनी ।५।
रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment