घाव
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली
येड्याबांगड्याच्या मनी
सादासुदा भक्तीभाव
नदी नाले दगडात
सिवारात त्याचा देव ।१।
सूर्व्य नारायना आंदी
येते आपरंग चेव
सडा सारोन करून
धुते अंतरीचा देव ।२।
संबा पाराबती रूप
पाप करमाचं भेव
घर वावराची माया
ढोरा वासरात जीव ।३।
उभा आडवा सारखा
त्याचा पान्यावानी भाव
कनसात मानसात
केला नाही भेदभाव ।४।
देते घासातला घास
सादाभोरा सदासिव
नाही ध्यानीमनी याच्या
जातीपातीची गा सीव ।५।
राजकारन्यायीचा डाव
उले धरमाचे पेव
गावगाड्याच्या मस्तकी
घाले कुराडीचे घाव ।६।
रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment