राजकारनाचा पान
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली
येका मताच्या नंद्याले
येका दिवसाचा मान
खांदसेकनी करून
जुवाखाली त्याची मान ।१।
येका दिवसी वलीत
मांगे दारोदारी दान
पाच साल रदवून
नेते खुंदाडते रान ।२।
लोकसेवक नावाले
बादस्यावानीच स्यान
पाचा वरसात घेते
कोटी कोटीची उडान ।३।
पोट्टे वर्गनीत खूस
माय बाप हयरान
मोरच्यात दंगलीत
फुकटचे डंडे खानं ।४।
खांद्या रंगोरंगीचे झ्येंडे
जाती धरम नावानं
साद्या सुद्याले लागला
राजकारनाचा पान ।५।
रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment