Wednesday, August 24, 2022

भाव पस्तुरीले आला. varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

भाव पस्तुरीले आला
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

माल मोंड्याचा बजारी
वाया दलालीत गेला
जुगाडाच्या तंतरानं
भाव पस्तुरीले आला ।१।

सारा उरफाटा न्याव
साव जेलामंदी गेला
चोट्ट्यायले हार तुरे
भाव पस्तुरीले आला ।२।

सीध्या सरख्याले भेव
जीव टांगनी लागला
उसवून भरवसा
भाव पस्तुरीले आला ।३।

सेक चुलीच्या भोगाले
उल मारते गा डल्ला
कल्ला गल्ली गल्लीतून
भाव पस्तुरीले आला ।४।

कापराच्या बट्टीवानी
जीव उपवून गेला
अधरयेलाच्या गुनानं
भाव पस्तुरीले आला ।५।

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

No comments:

Post a Comment