Friday, August 26, 2022

हिरवळली धरणी. Marathi language _ मराठी भाषा

हिरवळली धरणी
Marathi language _ मराठी भाषा

खेळ उन सावलीचा
हिरवळली धरणी
अडखळत्या मेघांत
विद्युल्लतेची हरिणी ।१।

सुमधुर कलरव
वाहे खळखळ पाणी
बासरीवर भैरवी
आळवतो चक्रपाणि ।२।

सळसळणारा वारा
रानभूल ही करणी
घुटमळती कंपने
दव भिजल्या चरणी ।३।

मृदू निर्मळ तरळ
परिमळते त्रिवेणी
आभाळाच्या पाठीवर
इंद्रधनुष्याची वेणी ।४।

प्रतिबिंब हे स्वप्नांचे
नितळ आरसपानी
रुणझुणती पैंजण
स्तब्ध अवखळ चानी ।५।

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

No comments:

Post a Comment