Tuesday, August 16, 2022

गंगा वावरी नाचली. varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

गंगा वावरी नाचली
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

काकरात हिरवाई
गंगा वावरी नाचली
बुचकडून पान्यात
मान मालानं टाकली ।१।

दोन सिरव्याची आस
फासी झडीची लागली
कास कुंदा तनकट
करे फुकाची चुगली ।२।

मुऱ्या बूड कुइजले
पानं पिवरी फिफोली
पीकपान्याच्या जुव्यात
भाऊ जिंदगी हारली ।३।

मातीतल्या फसलीची
खूसी पान्यानं इरली
झर्र पाझरा वावरी
माती उनाले झुरली ।४।

कवा येईन वरानी
आता उम्मीद सरली
वावरातली गा गंगा
डोऱ्यातून बी झरली ।५।

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

No comments:

Post a Comment