⚜पायी अलकाच्या वारा⚜
धबधबा पाठी ओठी
वाहे चैतन्य गहन
निळ्या काळ्या लाल रेघी
शांत निवांत हे मन..
केशसंभार रेशमी
वश मेघ अवखळ
प्रभा सोनेरी तरंगे
पाठशिवणीचा खेळ..
चंद्र झुंबर गळ्यात
दूर क्षितिज लोभस
जलप्रपात प्रतली
जलपरीचा हा भास...
ओठ बंद हे बोलके
जसे धनुष्य कमान
बोट बोटात गुंफूनी
साहे प्रत्यंचेचा ताण...
ओला कातळ भाळला
जळबिंदूंना माळतो
पायी अलकाच्या वारा
शीळ घालूनी वळतो...
©️✒ सुरेश महादेवराव
देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment