⚜ कंदी तपला सन्नाट ⚜
कंदी तपला सन्नाट
कंदी गाजला भिजला
करोन्याले घेऊन थो
उनारा गा बह्यकला
रागो भरे सूर्व्यदेव
त्याले चिडवे सिरवे
माट्या करे धिंगामस्ती
गोल गोल गा फिरवे
लोकं घरामंदी बंद
काम धंद्याले मनाई
चिंता कास्तकारायले
कसी भराची बिजाई
किती आले किती गेले
पर ह्या साली तितंबा
ह्या उनारा उनाड
नाही झाडाले यी आंबा
गेली लगनसराई
आले तोंडाले मुसके
वर खाली दचडलं
असे दावले हिसके
✒ सुरेश महादेवराव देशमुख
नागपूर
No comments:
Post a Comment