आशा
Marathi language _ मराठी भाषा
कंठी तृष्णा
शुष्क ओठ
दृष्टी लोट
मृगजळाचा ....
सत्य नी स्वप्न
दोन तीर
केंद्र शरीर
प्रवाहाचा...
भाळी आठी
कराग्रे पद्म
भाग्य छद्म
करतलाचा...
चाकोरीत पाय
मनी धाडस
भित्रं पाडस
हरिणीचा...
क्षितिजापार
विहंग झेप
कवच लेप
नव आशेचा....
रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment