Wednesday, December 7, 2022

मधुर वेदना ( मराठी कविता ). Marathi language _ मराठी भाषा

मधुर वेदना
Marathi language _ मराठी भाषा

पापण्यांचे भिरभिरते पक्षी
गालांवर अश्रू रेखिते नक्षी

विस्कटलेली भांगेची वाट
अडखळणारी केसांची लाट

भाळी कुंकवाची रवि प्रतिमा
कपोलांवर उषेची लालिमा

भुवयांचे क्षितिज वर्तुळ
नभी स्मृतीमेघांची वर्दळ

नासिकाग्र लालबुंद जीवघेणा
अंत:करणात मधुर वेदना

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

No comments:

Post a Comment