Friday, December 2, 2022

मनाला स्पर्शून गेला ( मराठी कविता )

मनाला स्पर्शून गेला
Marathi language _ मराठी भाषा

एक बोल
उबदार
मनाला स्पर्शून गेला .
कहाणी _ 
जी अपूर्ण होती
ती पूर्ण झाली ,
अधरांवर एक
नवीन लकेर
तरंगून गेली . ....

एक चेहरा
हुरहूर
मनाला लावून गेला . 
पापणी _
कस्तुरीगंध
स्वप्न मार्गातून
मधासारखी नितळ ,
सलज्ज
हळूच खुलली.....

एक कटाक्ष
नयनशर
मनाला भेदून गेला .
मनी _
आनंदाने तारका
धारण केल्या , 
हवेत तरंगती
गुलाबी सावल्या...

एक मृग
तृष्णेचा तर
मनाला स्पर्शून गेला....

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

No comments:

Post a Comment