भास स्वप्नाचिये दास
Marathi language _ मराठी भाषा
अंतहिन हा दिगंत
झेप धर्म अनमोल
बळ पंखात अनंत
ऊभा आसमंत तोल ।धृ।
संथ सारा आसमंत
चरा टिटवीचे बोल
पार पापणीचा संत
सदा पाझरते ओल ।१।
दाह सरणाचा मोह
धर्म मरणाचा फोल
गळा विलाप आरोह
वेळ अवरोह खोल ।२।
भास स्वप्नाचिये दास
गुढ पाताळी सखोल
सत्य चंदनाचा वास
त्याचे भुजंगाला मोल ।३।
घसा पोकळच वासा
शब्द आवंढा अबोल
सुन्न डोकी अवदसा
वाजे प्रलयाचा ढोल ।४।
वळवळ चळवळ
फेरा गरागरा गोल
घरी दारी वावटळ
आता सावर रे तोल ।५।
रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
खूप मस्त कविता.
ReplyDeleteधन्यवाद सर
Delete