उघाड
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली
आला जी मिरुग , हासला आखाड
झाला जी बह्याड , अरदडा ।१।
इत्तुकले जीव , धकवे पहाड
दोनी हात जोड , अकुरले ।२।
हिरवे चऊक , वावरा रफाड
येई लय लाड , देखुनिया ।३।
गेला पुक कोड्डा , पडली उघाड
नसीब गोट्याड , का लिवले ।४।
मुलमुल पाह्ये , चिम्ले माल झाड
दोन ठेंब धाड , त्हानेसाठी ।५।
हमेस्या आमच्या , नसीबी उघाड
रिकामे भदाड , सपनाचे ।६।
सपे आस सास , वावर उजाड
हालाचे पहाड , सिरावरी ।७।
भर बरसादी , कोड्डे नाले आड
डोरे बी म्याहाड , बिना आसू ।८।
कसा वाचवू रे , फसलीचा गड
टपले गिधाड , चारी आंग ।९।
इज चमकव , करि कडकड
आता तरी पाड , पानी बाप्पा ।१०।
रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment