Thursday, June 10, 2021

सवातीचा मोती. varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

सवातीचा मोती
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

जप तब्येत पान्याले
सोड जादू भानामती
आखाड्यातल्या मातीले
भिडव रे तुही छाती ।१।

दान देवाजीचं तन
सोड साऱ्या कुरापती
कर कुडीचं जतन
नको आनू रे आफती ।२।

जीव देहात वसला
जसा सवातीचा मोती
असा रेसमी कोसला
नको करू त्याची माती ।३।

नव खिडकी दरुजे
दोन डोऱ्याचिया जोती
आंगी देवबाप्पा रुजे
कर त्याचीच आरती ।४।

धन दवलत सारी
हाये तुह्यावाल्या हाती
योग देहाची तिजोरी
पाह्य अनमोल किती ।५।

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

2 comments: