माया ( अभंग )
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली
तरहातावर , फाडली गा कीर
लोभाचं उकीर , तनी मनी ।१।
सरली उमर , खपे इर इर
भवसागर तीर , गवसेना ।२।
स्यायना बह्याड , लकीर फकीर
दिसे ना सुकीर , अगासात ।३।
जुगाड तंतर , पाय दोनी तीर
डोरे भिरभिर फिफोलीचे ।४।
इपदाचा पूर , डगमगे धीर
मेढ गाडे वीर , मधातच ।५।
भेदले असार , हिंद्यानाचा तीर
मारे नेम मीर , भल्यासाठी ।६।
नजर भरम , गरीब अमीर
मेंडक्या विहीर , दुनिया जी ।७।
मायाच्या पूरात , वाहे मिठ्ठू कीर
गाठते गा तीर , ग्यानवंत ।८।
रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment