🌧️ ढग काळे पांढुरके 🌧️
ढग काळे पांढुरके
नभी आशेचा सागर
ढग काळे काजळात
डुचमळते घागर
ढग काळे पांढुरके
देह विठूचा आगर
ढग माळे काळजात
मनराऊळी जागर
ढग काळे पांढुरके
ओली फसवी सगर
ढग गाळे इंद्रधनू
पायी चुरडे तगर
ढग काळे पांढुरके
शब्द कालीदास भर
ढग पाळे प्रेमधर्म
शोधे अलका नगर
ढग काळे पांढुरके
भावनेचीया पाभर
ढग भाळे मातीवर
थेंबा कोंबात पाझर
©️✒ सुरेश महादेवराव
देशमुख , नागपूर
खुब साजरी कविता
ReplyDeleteधन्यवाद मनोज जी
Delete