Thursday, November 17, 2022

तरंग ( मराठी कविता ). Marathi language _ मराठी भाषा

तरंग
Marathi language _ मराठी भाषा

हिरण्यगर्भाची अक्षय्य उर्जा
लेवून पंखात
घेतली भरारी
नील आकाशात
शशांक वर्तुळ
दृष्टीपथात
विचरतो आहे मन विहंग ।

शांत अथांग सागराची चकाकी
घेऊन डोळ्यात
नवीन उभारी
रोमारोमात
आकाशगंगा
पूर्ण कह्यात
लहरती आहे जल तरंग ।

वास्तवाची दाहक सत्यं
रेखून डोक्यात
आणी शिसारी
घन अंधारात
केशरी उषा
गुलाबी स्वप्नात
विखुरली आहे रात्र अभंग ।

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

No comments:

Post a Comment