दगडं पूंजत हाये
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली
हाथरल्या सातरीत
सपनं निजत हाये
पांघरल्या घोंगड्यात
दव बी भिजत हाये ।१।
भुकेजल्या लेकरात
आसवं खिजत हाये
सातरल्या वरनात
भरोसा सिजत हाये ।२।
उतरल्या जिंदगीत
ठिगरं रुतत हाये
नागरल्या वावरात
फसल कुथत हाये ।३।
अंधारल्या सामटीत
कंदील इझत हाये
भंगरल्या खंडाऱ्यात
मयाली झिजत हाये ।४।
खंगरल्या बगिच्यात
हिंमत कुजत हाये
चेंदरल्या नसीबात
दगडं पूंजत हाये ।५।
रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment