उलंगला गावगाडा
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली
दोन पाये च्यार पाये
वाघं करते बेजार
घेते नड्डीचाच घोट
झालं जगनं उधार ।१।
भायी पयदले रानी
भेबारले कास्तकार
तीन लोक दाही दिस्या
लागे त्यायले बेकार ।२।
किड्या - मुंगीवानी गत
केलं राज्याले लाचार
उलंगला गावगाडा
गेलं झोपी सरकार ।३।
फसलीच्या इमल्याचं
ताल तुंब्याच जुकार
घेते लावून गा फासी
जीत्यापनाले नकार ।४।
सीद्यासाद्या मानसाले
नायी आकार उकार
तरहाती घोगल्यात
सारे सपले इकार । ५ ।
झाले मानसाचे आता
अजबच जनावर
करे गरीबगुद्याची
दिवसानीच सिकार । ६ ।
रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment